You are currently viewing वाढदिवसाच्या दिवशीच केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आमदार नितेश राणेंकडून अनोखे गिफ्ट

वाढदिवसाच्या दिवशीच केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आमदार नितेश राणेंकडून अनोखे गिफ्ट

वाढदिवसाच्या दिवशीच केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आमदार नितेश राणेंकडून अनोखे गिफ्ट

साळशी मधील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

देवगड

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसा दिवशीच आमदार नितेश राणे यांनी त्यांना एक अनोख्या प्रकारे गिफ्ट दिले. कणकवली मतदारसंघातील देवगड तालुक्यामधील साळशी गावातील अनेक ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज राणेंच्या वाढदिवसा दिवशीच भाजपामध्ये प्रवेश केला. ओम गणेश या निवासस्थानी आमदार नितेश राणे यांनी प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत सत्यवान गावकर, अमोल गावकर, बापू गावकर, नंदू गावकर, शशिकांत साटम, हरी गावकर, अनिल सावंत, केशव लब्दे, लवु लब्डे, मंगेश लाड, मधुकर लाड, नितीन लाड, भाऊ पवार, किशोर साळस्कर, माजी सरपंच अमित साळस्कर, हर्षल साळस्कर, हेमंत गावकर, अर्जुन गावकर, विकास गावकर, मुरारी सावंत, बाळा मिराशी, शशिकांत देवणे, जगदीश देवणे, महादेव देवणे, पांडुरंग देवणे, हर्षद देवणे, दिनेश सावंत, प्रथमेश नाईक, हर्षद नाईक, अजय नाईक, साळशी सोसायटीचे व्हाईस चेअरमन सिताराम नाईक, प्रमोद परब, राजा सावंत, गोट्या साळस्कर यांच्यासह अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी देवगड तालुका भाजपचे संदीप साटम यांच्यासह अन्य उपस्थित होते. त्यावेळी आमदार नितेश राणे यांनी त्यांचे स्वागत करत साळशी गावामध्ये भाजपाची असलेली ताकद अजून मजबूत झाल्याचे उद्गार काढले.

प्रतिक्रिया व्यक्त करा