You are currently viewing हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिम्मित दोडामार्ग येथे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत आदरांजली..

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिम्मित दोडामार्ग येथे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत आदरांजली..

दोडामार्ग :

 

दोडामार्ग येथे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली.

दोडामार्ग नगरपंचायत निवडणूक अपयशानंतर संपूर्ण दोडामार्ग तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. त्यांनंतर प्रथमच जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत दोडामार्ग येथे माजी प्रमुख पदाधिकारी व शहरातील प्रमुख कार्यकर्ते निवडून आलेले उमेदवार व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत दोडामार्ग शहरात शिवसेनेची बैठक झाली.

यात प्रामुख्याने दोडामार्ग तालुका संपर्क प्रमुख केशव धाऊसकर, उपजिल्हाप्रमुख गणेशप्रसाद गवस, माजी तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, नवनिर्वाचित उमेदवार वासंती मयेकर, आनंद रेडकर, योगेश महाले, सूचन कोरगावकर, वैभव साळकर, माजी महिला तालुकाप्रमुख श्रेयाली गवस, विनिता घाडी, लवू मिरकर, ओंकार कुलकर्णी, प्रशांत केरकर, दिवाकर गवस, बबलू पांगम, प्रशांत नाईक, रामदास मेस्त्री, भगवान गवस, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी हा जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला. दरम्यान या बैठकीत नगरपंचायत निवडणूक निकालाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा