You are currently viewing गर्दी किंवा मास्कचा वापर न करताना कोणीही दिसल्यास कारवाई करावी – समिर रेडकर

गर्दी किंवा मास्कचा वापर न करताना कोणीही दिसल्यास कारवाई करावी – समिर रेडकर

दोडामार्ग
कोरोना चा प्रसार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत आहे तो प्रसार रोखण्यासाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे परंतु नागरिकांनी सुद्धा सहकार्य करणे गरजेचे आहे. मास्क न वापरणे गर्दी करणे असे प्रकार दिसून आल्यास नगरपंचायतीने कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते समिर रेडकर यांनी मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांच्याकडे केली आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढतच आहे शासनस्तरावरून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे परंतु प्रसार काही केल्या थांबत नाही आहे. कोरोना ची साखळी तोडायची असल्यास योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे परंतु दोडामार्ग शहरात याचे चित्र काही वेगळेच दिसून येत आहे. बँका तहसीलदार कार्यालय बाजारपेठ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळते. बाजारपेठत गर्दी किंवा मास्कचा वापर न करताना कोणीही दिसल्यास योग्य ती कारवाई नगरपंचायतीने करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते समिर रेडकर यांनी मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांच्याकडे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − twelve =