माडखोल धवडकी नंबर नंबर 2 चे प्रज्ञाशोध परीक्षेत यश.
सावंतवाडी
माडखोल धवडकी नंबर 2 च्या विध्यार्थ्यांनी पुनः एकदा शाळेला अभिमान वाटावा अस यश मिळवील असून या शाळेची संस्कृती गुरुकूल प्रज्ञाशोध परीक्षेत महाराष्ट्र राज्यात १५ वी आली आहे तर तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ४ थी आली आहे. तर धैर्य कोळमेकर, रुद्र पाटील व प्रतिक गावडे हे विधार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. गुरुकूल प्रशाशोध परीक्षा २०२५ माडखोल नं . २ , धवडकी शाळेचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले यामधील इ . ३ री मध्ये शिकणारी कु . संस्कृती चोपडे हिने २५४ गुण मिळवून राज्यात १५ वी तर जिल्हयात ४ थी येण्याचा बहुमान पटकवला. तर इ . ३री मधील कु . धैर्य कोळमेकर याने २३० गुण व कु . रुद्र पाटील २१६ गुण व इ . ६ वी चा कु . प्रतिक गावडे या तिघांनीही जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे . यशस्वी सर्व सर्व विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन कमिटी तसेच शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी या मुलां बरोबरच यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक वृंदाचेही पालक, ग्रामस्थ यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.