You are currently viewing कणकवली नगरपंचायत कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून ३३६ रुग्णांवर मोफत सेवा – समीर नलावडे 

कणकवली नगरपंचायत कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून ३३६ रुग्णांवर मोफत सेवा – समीर नलावडे 

कणकवली

कोरोना साथ आटोक्यात येत असल्याने शासनाच्या आदेशानुसार कणकवली नगरपंचायत कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत ३३६ रुग्णांवर उपचार केले. आमच्या कोविड सेंटर गेल्या साडे तीन महिन्यात एकाचाही मृत्यू झाला नाही. आता तिसरी लाट आल्यास आणि शासनाने परवानगी दिल्यास आम्ही पुन्हा कोविड सेंटर चालू करण्याची आमची तयारी आहे अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. तसेच सामाजिक संस्था व उद्योजक, दानशूर व्यक्तीकडून मदत देणाऱ्यांचे आभार व्यक्त करत आहोत असे ते म्‍हणाले. कणकवली नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत ते होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, नगरसेवक अभिजित मुसळे, शिशिर परुळेकर, विराज भोसले, महेश सावंत, किशोर राणे, अजय गांगण आदी उपस्थित होते.

कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर कणकवली शहरात कोविड सेंटर उभारलं होते.१६ मे ला चालू केलं होतं ते ३१ ऑगस्टला बंद करण्यात आले आहे.आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचा आदेश आले आहेत,त्यामुळे बंद करण्यात आले आहे.कोविड सेंटरच्या माध्यमातून १७ मे पासून ३१ ऑगस्ट पर्यत ३३६ रुग्णांवर उपचार केला.दाखल झालेले सर्व रुग्ण ठणठणीत आहेत,आमच्या कोविड सेंटर मध्ये एकही रुग्ण दगावला नाही,असे समीर नलावडे यांनी सांगितले.
साडेतीन महिन्याचा कालावधी होता. १२ डॉक्टरांनी काम केलं, नर्स ४ वार्डबॉय २ होते.कोविड सेंटर चालू केल्यानंतर दानशूर व्यक्ती व त्यात्यासाहेब मुसळे ट्रस्ट, रोटरी क्लब, उद्योजक यांनी मदत केली. थर्मल गन, बीपी मशीन,
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन या मशीन दिल्या आहेत.
रोटरी क्लबने जम्बो सिलेंडर,३३६ वेलकम किट दिले,साज ग्रुप तर्फे जम्बो किट,विद्यामंदिर दहावी बॅच कडून मदत,केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट मास्क, सँनिटायझर,राजु मानकर, संजय कामतेकर,उद्योगपती प्रशांत तेंडुलकर यांनी गोळ्यांचे किट दिले आहेत.

या कालावधीत मुख्याधिकारी, कर्मचारी, स्वच्छता दूत, नगरसेवक सर्वांनी एकत्रित काम केले. डॉ.तायशेट्ये यांनी सेवा दिली. आ.नितेश राणे यांनी परवानगी मिळण्याची मेहनत घेतली,आ.प्रसाद लाड ५ तर नगरसेवक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन दिले. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष,प्रांताधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी व जेवण पुरवठा श्री.आचरेकर या सर्वांनी सहकार्य केल्यामुळेच आम्ही यशस्वी कोविड सेंटर चालवू शकलो असे समीर नलावडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + twelve =