You are currently viewing कणकवलीच्या काशीविश्वेश्वर मंदिरात 9 ते 18 एप्रिल रामनवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकवलीच्या काशीविश्वेश्वर मंदिरात 9 ते 18 एप्रिल रामनवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकवलीच्या काशीविश्वेश्वर मंदिरात 9 ते 18 एप्रिल रामनवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली

शहरातील श्री देव काशीविश्‍वेश्‍वर मंदिरात 9 ते 18 एप्रिल या कालावधीत रामनवमी उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.
9 ते 16 एप्रिल या कालावधीत दररोज सायंकाळी 6 वा. ह. भ. प. किरण पारकर यांचे कीर्तन, 7 वा. आरती, रात्री 8 वा. श्रींची पालखी मिरवणूक कढण्यात येईल. बुधवार 17 रोजी सकाळी श्रींची पूजा व अभिषेक, 10 वा. कीर्तन, दुपारी 12.30 वा. श्री राम जन्म सोहळा, दुपारी 3 वा. भजन, सायंकाळी 4 वा. लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्‍वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांचे नाट्य सादर होईल. रात्री 7.30 वा. दैनंदिन आरती, 9.30 वा. श्रींची पालखी मिरवणूक, त्यानंतर हरिपाठ, गुरुवार 18 रोजी रात्री 9.30 वा. श्रींची पालखी मिरवणूक, त्यानंतर हरिकीर्तन, लळीत हे कार्यक्रम होतील. तरी या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री देव काशीविश्‍वेश्‍वर देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा