मसुरे :
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री ललित गांधी यांची निवड जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी झाल्याबद्दल महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स उपाध्यक्ष तथा उद्योजक डॉक्टर दीपक मुळीक परब यांच्या हस्ते मुंबई येथे ललित गांधी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, उपाध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष संगीता पाटील, उपाध्यक्ष रमाकांत मालू, माजी उपाध्यक्ष कांतीबाई चोपडा, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझरचे डायरेक्टर उद्योजक विजय मुत्थिया, अध्यक्ष करुणाकरण शेट्टी आणि महाराष्ट्र चेंबर व कॉमर्स सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉक्टर दीपक परब म्हणाले श्री ललित गांधी हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स भूषण आहेत. जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची झालेली निवड अतिशय योग्य आहे.