*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। गण गण गणात बोते ।। जय गजानन ।।
__________________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ७४ वे
अध्याय – १३ वा , कविता – २ री
___________________________
विघ्नसंतोषी असे लोक असती । जे चांगल्या कार्यात अडथळे आणिती । यांच्या उचापती खोडा घालिती ।। १।।
मठाच्या कामात असेच झाले । चौकशीचे विघ्न आलें।
खोटेच सांगितले । अशा लोकांनी ।। २ ।।
जोशी अधिकारी चौकशीस आले ।
कागदपत्रे त्यांनी तपासले । संस्थेस दंड योग्य नाहीये म्हणाले । झालेला दंड त्यांनी माफ केला ।।३।।
जोशींची ही कृती । पाहुनी सारे आनंदती । गजानन कृपेची प्रचिती । आली सर्वांना ।। ४ ।।
बांधकाम पूर्ण झाले । स्वामींनी यात लक्ष घातले । म्हणून हे
कार्य सिद्ध झाले । ही भावना भक्तांची ।। ५ ।।
सत्कार्य-महती । स्वामी जाणिती । कृपा करिती । असे कार्य करणाऱ्यांवर ।।६ ।।
नव्या मठात स्वामी आले । स्थान हे पुनीत झाले । भक्तगण
नित्य वाढू लागले । दर्शनास येणारे ।। ७ ।।
**************
क्रमशः करी हे लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास – अरुण वि. देशपांडे – पुणे
___________________________