देवगड पंचायत समिती सभापती निवडणुक 19 जानेवारी रोजी

देवगड पंचायत समिती सभापती निवडणुक 19 जानेवारी रोजी

सिंधुदुर्गनगरी

देवगड पंचायत समिती सभापती यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठीच्या निवडीसाठी 19 जानेवारी 2021 रोजी कणकवली पंचायत समितीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 75 नुसार पंचायत समिती सभापती पद भरणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष सभा आयोजित करणे आवश्यक असल्याने सभापती निवडणूक घेण्यासाठी 19 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3.00 वा. विशेष सभा बोलावण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.     या निवडणूकीसाठी पिठासन अधिकारी म्हणून तहसिलदार, देवगड यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच देवगड पंचायत समिती सभापती हे पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. सभापती पंचायत समिती यांचा कालावधी दिनांक 26 डिसेंबर 2019 पासून होणाऱ्या अडीच वर्षांच्या कालावधीमधील उर्वरीत कालावधीकरिता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा