अभिनेता सोनू सूदची हायकोर्टाकडे धाव !!!!

अभिनेता सोनू सूदची हायकोर्टाकडे धाव !!!!

अभिनेता सोनू सूदची हायकोर्टाकडे धाव !!!!

महापालिकेने अनधिकृत बांधकाम प्रकरणी बजावलेल्या नोटिसीविरोधात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने हायकोर्टात धाव घेतली आहे. सोनूने गेल्या आठवड्यात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते की, आपण सहा मजली शक्तीसागर भवनमध्ये कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही. हायकोर्टात या याचिकेवर आज (सोमवार) न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कोर्टासमोर सुनावणी होणार आहे.

सोनू सूदचे वकील अ‍ॅड. डी. पी. सिंह यांनी म्हटले की, याचिकाकर्त्यांनी इमारतीमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. केवळ महाराष्ट्र प्रदेश आणि नगरविकास कायद्यांतर्गत परवानगी असलेलाच बदल करण्यात आला आहे. याचिकेत म्हटले की, कोर्टाने बीएमसीद्वारे गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये पाठवलेली नोटीस फेटाळून लावली. तसेच सोनूविरोधात कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश देत अंतरिम दिलासा दिला होता. गेल्यावर्षी बीएमसीकडून नोटीस मिळाल्यानंतर सोनूने दिवाणी कोर्टात धाव घेतली होती. मात्र, या कोर्टात दिलासा मिळू न शकल्याने त्याने हायकोर्टात अपील केलं होतं.

बीएमसीने गेल्या सोमवारी जुहू पोलिस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये सोनू सूदविरोधात कथित स्वरूपात निवासी संकुलात विनापरवानगी हॉटेलमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. बीएमसीने या इमारतीचे निरीक्षण केल्यानंतर पोलिसांना तक्रार अर्ज पाठवला होता तसेच यात आढळून आले होते की, सोनूने कथित स्वरूपात नियमांचे पालन केले नाही. तसेच गेल्यावर्षी सात ऑक्टोबर रोजी नोटीस दिल्यानंतरही अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा