You are currently viewing आमदार वैभव नाईक यांना महाराष्ट्र शासनाकडून एक्स दर्जाची सुरक्षा

आमदार वैभव नाईक यांना महाराष्ट्र शासनाकडून एक्स दर्जाची सुरक्षा

मुंबई

महाराष्ट्र शासनाने राज्यातील नेतेमंडळी व प्रमुख व्यक्ती यांच्या सुरक्षेचा आढावा घेत शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सुरक्षेत वाढ अथवा कपात केली आहे. या सोबतच काही प्रमुख व्यक्तींना नव्याने सुरक्षा देण्यात आली आहे. यात सिंधुदुर्गातील शिवसेनेचे नेतृत्व आमदार वैभव नाईक यांच्या समावेश असून त्यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आह.

भारतातील सुरक्षा व्यवस्था झेड प्लस, झेड, वाय, आणि एक्स या चार विभागांमध्ये विभागलेली आहे. यासह स्पेशल सुरक्षाही असते. एक्स दर्जाची सुरक्षा ही वरील प्रमुख सुरक्षा कॅटेगरीतील सुरक्षेची पहिली पायरी मानली जाते.

आमदार वैभव नाईक हे दोन टर्म आमदार म्हणून निवडून आले आहेत. विद्यमान राज्य सरकारमध्ये प्रमुख शासकीय समितीत आमदार वैभव नाईक यांना यापूर्वी स्थान देण्यात आले आहे. एकूणच सिंधुदुर्गातील प्रमुख नेत्यांमध्ये आमदार वैभव नाईक यांचा समावेश होतो. आक्रमक राजकीय वक्तव्यांसाठीही आमदार नाईक ओळखले जातात.

राज्यातील सुरक्षा यादीत आमदार वैभव नाईक यांचा समावेश त्यांचे राज्याच्या राजकीय पटलावर वाढलेले स्थान ठळकपणे दर्शवत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =