You are currently viewing एमआयटीएम इंजिनियरिंग महाविद्यालयात अभियंता दिन साजरा..

एमआयटीएम इंजिनियरिंग महाविद्यालयात अभियंता दिन साजरा..

ओरोस :

 

मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (एमआयटीएम) कॉलेज, ओरोस येथे भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त अभियंता दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य सूर्यकांत नवले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी प्राचार्य सूर्यकांत नवले यांनी अभियांत्रिकी क्षेत्र हे मोठया प्रमाणात विस्तारित असून विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी स्वतःचे ज्ञान अद्यावत ठेवण्याचे आवाहन कार्यक्रमांत बोलताना केले.

तसेच यावेळी कॉलेजचे प्राचार्य प्रा. सूर्यकांत नवले यांनी अभियंता कसा असावा, त्याची देशाच्या विकासासाठी समाजाप्रति असणाऱ्या जबाबदारीची जाणीव करून देऊन अभियंता काय करू शकतो याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी संगणक विभागाचे मनोज खाडिलकर, परीक्षा विभाग प्रमुख विशाल कुशे आणि डीन पूनम कदम यांनी अभियंता दिनाबाबत थोडक्यात मनोगत व्यक्त केले.

अभियंता दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी प्रश्नमंजुषा, पोस्टर मेकिंग, संभाषण कौशल्य आदी स्पर्धा घेण्यात आल्या. प्रश्नमंजुषा स्पर्धेत डिग्री मधून दिनार लाड, महेश राठोड, रामचंद्र मुळीक, पियुष कुशे, हरिशचंद्र पेडणेकर कुणाल सावंत तर डिप्लोमा मधून हेमंत जिकमडे, विघ्नेश शिरोडकर, प्रकाश गायकवाड, गणेश घाडी, स्वराज आहेर, साहिल मेमन, पोस्टर मेकिंग स्पर्धेमधून प्रणय नादिवडेकर, महेश राठोड, राणी खंदारे आणि संभाषण कौशल्य स्पर्धेतून समीर पवार, अभिषेक कासकर, महेश राठोड या विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्य सूर्यकांत नवले यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी राकेश पाल, डीन पूनम कदम, प्रा. विशाल कुशे, प्रा. तुषार मालपेकर, प्रा. बसवराज मगदूम, प्रा. मनोज खाडिलकर, प्रा. सुकन्या सावंत, प्रा. सलीमा शेख, प्रा. रोशनी वरक यांच्यासह संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या पालव व यश बांदेकर या विद्यार्थ्यांनी केले तर वैभव परब या विद्यार्थ्यांने आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 12 =