You are currently viewing “ते” सात नगरसेवक शिवसेनेला “व्हॅलेंटाईन गिफ्ट” – नितेश राणे

“ते” सात नगरसेवक शिवसेनेला “व्हॅलेंटाईन गिफ्ट” – नितेश राणे

वैभववाडीतील नगरसेवकांच्या पक्षप्रवेशावरून खोचक टीका…

कणकवली

वैभववाडीचे ”ते”पाठवलेले सात नगरसेवक हे आमच्याकडून शिवसेनेला ”व्हॅलेंटाईन डे”चे गिफ्ट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या हॉस्पिटलसाठी परवानगी देताना काही भेट स्विकारली नाही. ते पुष्पगुच्छ सुध्दा घेणार नाहीत. त्यामुळे त्यांना आम्ही नगरसेवकांच्या रूपात भेट पाठवली, अशी खोचक टीका आमदार नितेश राणे यांनी आज येथे केली.
वैभववाडी नगरपंचायतचे सात नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहेत. लवकर त्यांचा प्रवेश होणार आहे. या पार्श्वभूमीवर श्री राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले बातमी मी वाचली शिवसेनेवर आमचे जुने प्रेम आहे. या प्रेमाला कधीच विसरायचे नसतं, असे सगळेच म्हणतात, आणि आता वैभववाडी शिवसेनेची परिस्थिती जर तुम्ही पाहिले तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे मूळ शिवसेनेचे उमेदवार म्हणून पण उभा राहू शकत नाही, किंवा त्यांच्या उमेदवार पण भेटणार नाही. अशी परिस्थिती आहे.

शिवसेना पक्ष माननीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. आणि साहेबांच्या आदर आम्ही आजही करतो, अजून एक बाब अशी आहे की, मेडिकल कॉलेजच्या नियमित परवानगीसाठी फोन केला होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी चांगला प्रतिसाद दिला. आणि आमच्या मेडिकल कॉलेजला आवश्यक परवानगी दिली. त्यांचे आभार मानण्यासाठी ही भेट पाठवली असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 2 =