You are currently viewing _दोडामार्ग हायस्कूल मध्ये वार्षिक क्रिडास्पर्धा उत्साहात संपन्न

_दोडामार्ग हायस्कूल मध्ये वार्षिक क्रिडास्पर्धा उत्साहात संपन्न

दोडामार्ग

नुकतीच दोडामार्ग इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, दोडामार्ग मध्ये वार्षिक क्रिडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये प्रमुख मान्यवरांमध्ये कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे बांधकाम सभापती श्री. नितीन प्रभाकर मणेरकर, शिक्षण व आरोग्य सभापती सौ. गौरी मनोज पार्सेकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. ज्योती रमाकांत जाधव, पंचायत समिती सदस्य श्री. बाबुराव धुरी, नगरसेवक श्री. रामचंद्र प्रभाकर मणेरीकर तसेच पालक-शिक्षक समितीच्या उपाध्यक्षा सौ. प्रीती बाबुराव धुरी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. शैलेश नाईक हे व्यासपीठावर उपस्थित होते.

क्रीडा ज्योत प्रज्वलित व क्रीडांगण पूजन श्रीफळ वाढवून श्री. नितीन मणेरकर यांच्या हस्ते करण्यात आले तर क्रीडा ध्वजारोहण श्री. बाबुराव धुरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धुरी आपल्या भाषणात म्हणाले की, या शाळेत होणाऱ्या शानदार कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्तीने सहभागी होत उत्कृष्ट खेळाडू म्हणून नावलौकिक प्राप्त करावे.

सौ. गौरी पार्सेकर आपल्या भाषणात म्हणाल्या की, खेळाच्या माध्यमातून आपल्या मधील कौशल्य विकसित करता येतात व व्यक्तिमत्व विकासास चालना मिळू शकते.
यावेळी सौ. ज्योती जाधव व सौ. प्रीती धुरी यांनी व इतर मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक श्री. नाईक यांनी विद्यार्थ्यांचे अंगीभूत गुणांचे कौतुक करत खेळाद्वारे आपल्या शाळेचा, आई-वडिलांचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन केले.

प्रास्ताविक शिक्षक श्री. आर. के. जाधव तर आभार शिक्षिका सौ. एन.एस.नारकर यांनी व्यक्त केले.

विभाग स्तरावर कराटे स्पर्धेतील निवड झालेला विद्यार्थी – नामदेव दळवी याच्या हस्ते क्रीडाज्योत दौड झाली. तर लातूर येथे राज्य स्पर्धेसाठी निवड झालेली कबड्डीची विद्यार्थिनी खेळाडू कुमारी हार्दि राजन साळकर हिने क्रीडा प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर रीतसर स्पर्धांना सुरुवात झाली. यावेळी कुडासे हायस्कूलचे क्रीडा शिक्षक श्री. गोंधळी सर व दिपकभाई केसरकर विज्ञान कॉलेजचे प्रा.श्री. पाताडे सर हे क्रीडा पंच म्हणून उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + 9 =