2021 असेल मोबाईल क्रांतीचे वर्ष..

2021 असेल मोबाईल क्रांतीचे वर्ष..

 

वर्ष 2021 सुरु हो ऊन आता पहिला आठवडा संपला आहे. अनेक तंत्रज्ञांच्या मते हे वर्ष मोबाईलमधील क्रांतीचे असेल. या वर्षाच्या मध्यास 5 जी फोन्स, तसेच फोल्डेबल हेंडसेट्‌स आणि उच्च व्हिडीओ निर्मितीसाठी लेन्स असलेले कॅमेरे मोबाईलमध्ये दिसतील. मोबाईल इंडस्ट्री पूर्णपणे बिनतारी होण्याच्या मार्गावर आहे. कंपन्यांनी ग्राहकांना वायरलेस इयरबड्‌सची सवय तर टाकलीच आहे, आता वायरलेस चार्जर आणि वायरलेस पॉवर बॅंकची सवय लागावी अशी कंपनीची इच्छा आहे पाहूया काय घडू शकते मोबाईलच्या विश्‍वात…

देशात अनेक दिवसांपासून 5G स्पेक्‍ट्रमची प्रतीक्षा होत आहे. बरेच 5G कंपॅटिबल स्मार्टफोन विकले जात आहेत, परंतु 5 जी नेटवर्क कोठेही उपलब्ध नाही.

5 जी 2021 मध्ये देशात येणार आहे. सरकार लवकरच 5 जी नेटवर्कचे स्पेक्‍ट्रम वाटप आणि लिलाव प्रक्रिया सुरू करणार आहे. एप्रिलपासून देशातील मेट्रो शहरांच्या निवडक मंडळांमध्येही 5 जी चाचण्या सुरू होतील अशी अपेक्षा आहे. या योजनेनुसार जुलै ते ऑगस्ट दरम्यान मेट्रो शहरांच्या निवडक सर्कलमध्ये 5 जी सुरू होईल. रिलायन्स जिओने इंडिया 2021 च्या उत्तरार्धात 5 जी सेवा सुरू करण्याची घोषणा देखील केली आहे. 5G आल्यानंतर सर्वाधिक फायद डिजिटल कंटेंटला होईल. वैद्यकीय आणि औद्योगिक क्षेत्रांनाही 5G चा लाभ मिळण्यास प्रारंभ होईल. 5G आल्यानंतर इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती येईल. 4G च्या तुलनेत 5G ची डाउनलोड स्पीड 10 ते 12 पटीने वाढेल. 5G डाउनलोड स्पीड 200 Mbps ते 370 Mbps पर्यंत असेल.

*फोल्डेबल स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात दिसतील*

अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी 2020 मध्ये आपआपले फोल्डिंग स्क्रीनचे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. यातील बहुतेक स्मार्टफोन एकतर जुन्या क्‍लेम शेल डिझाइनसारखे उघडणारे आहेत किंवा एखाद्या पुस्तकासारखे स्क्रीनला फोल्ड करता येतात किंवा विचित्र ड्युअल स्क्रीनचे फोन आहेत. आता 2021 मध्ये, फोल्डिंग स्मार्टफोनमध्ये आणखी बरेच डिझाइन दिसतील. ज्यामध्ये रोलेबल स्क्रीनचे स्मार्टफोन देखील असतील. डिझाइनच्या दृष्टीने रोलेबल स्क्रीन अधिक चांगली असेल, कारण पुस्तकासारखी फोल्ड होणार स्क्रीनमध्ये निशाण पडतात आणि फोन फोल्ड केल्यानंतर बराच जाड होतो. क्‍लेमशेल डिझाइनमध्ये सुरकुत्या सारखे निशाण पडण्याची भीती आहे. हे डिझाइन सुंदर तर दिसते मात्र यामध्ये फोन एखाद्या टॅबलेट कॉम्प्युटरच्या आकाराचा होत नाही.

2020 पूर्वी स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यांचा जास्त फोकस हा ‘फोटो चांगला काढतो’ यावर होता, मात्र 2021 पासून स्मार्टफोनच्या कॅमेराचा फोकस ‘हा व्हिडिओ चांगला रेकॉर्ड करतो’ यावर असेल. याचा संकेत 2020 च्या शेवटच्या तिमाहीत लॉंच झालेल्या बऱ्याच स्मार्टफोनमध्ये कंपन्यांनी दिला होता. आयफोन 12 सिरीजमध्ये डॉल्बी व्हिजनवर जितके लक्ष केंद्रित केले गेले, तितकेच नोट 20 अल्ट्रामध्ये 8 K व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि मॅन्युअल व्हिडिओ शूटिंग मोड देखील होते. तर विवोच्या एक्‍स सिरीजमध्ये गिंबल सारखे स्टेबलाइज्ड व्हिडिओ आणि आय ऑटोफोकस सारखे व्हिडिओला उत्तम बनवणारे फीचर्स देऊन केले होते. 2021 मध्ये लॉंच होणाऱ्या जवळपास प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला हीच बाब लक्षात येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा