You are currently viewing शिरगाव श्री राम मंदिरात १७ एप्रिल रोजी रामनवमी उत्सव

शिरगाव श्री राम मंदिरात १७ एप्रिल रोजी रामनवमी उत्सव

देवगड ::

 

देवगड तालुक्यातील शिरगाव- रामनगर येथील श्री राम मंदिरात बुधवार १७ एप्रिल रोजी रामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ११ वाजता किर्तन, दुपारी १२ वाजता श्रीराम जन्म सोहळा, महाआरती, महाप्रसाद, दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायण महापुजा व तीर्थप्रसाद, सांयकाळी ५ वाजता होम मिनिस्टर, सांयकाळी ७ वाजता हरिपाठ, रात्री ९.३० वाजता रंगीत दिंडी भजन स्पर्धा, आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी सर्व रामभक्तानी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे शिरगाव- रामनगर येथील श्री पावणाई बांदेश्वर मंडळाने कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा