You are currently viewing नामकरण ‘ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर’ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालवण

नामकरण ‘ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर’ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालवण

नामकरण ‘ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर’ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालवण

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालवणचे झाले नामकरण

समस्त मालवण वासीयांचा सन्मान ; राज्य शासनाचे आभार : भाजपा नेते निलेश राणे यांची प्रतिक्रिया

मालवण

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. त्यानंतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालवण या संस्थेचे नामकरण ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालवण, जि. सिंधुदुर्ग असे करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. या बाबत मंत्री लोढा म्हणाले “औद्योगिक संस्थांचे नामकरण हा केवळ एक निर्णय नसून, महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या संस्थांना आदर्श नेतृत्वांच्या नावाने ओळख मिळाल्याने या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची शिकवण व प्रेरणा मिळेल. युवकांचा कौशल्यविकास हे राज्याच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे, आणि या नावांमुळे प्रत्येक प्रशिक्षणार्थीला आपल्या कार्यात सामाजिक जबाबदारीची जाणीव होईल. हा उपक्रम नव्या पिढीला त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी प्रेरणा देईल आणि त्यांच्या मेहनतीला एक दिशा देईल.”

महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार : निलेश राणेमालवणचे सुपुत्र कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या सन्मानार्थ मालवण आयटीआय या संस्थेचे नामकरण ‘ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालवण’ असे करण्याचा स्तुत्य निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. या निर्णयाबद्दल महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार, शेकडो कुशल उद्योजक घडविणाऱ्या या औद्योगिक संस्थेचे झालेले नामकरण हे समस्त मालवणवासीयांना सन्मान देणार आहे. अशी प्रतिक्रिया भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा