You are currently viewing मेट्रो’ मुळे दक्षिण-मध्य मुंबई होणार अधिक वेगवान

मेट्रो’ मुळे दक्षिण-मध्य मुंबई होणार अधिक वेगवान

*’मेट्रो’ मुळे दक्षिण-मध्य मुंबई होणार अधिक वेगवान*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

दक्षिण मध्य मुंबईच्या पश्चिम भागाला मेट्रो मार्गिकेमुळे येत्या काळात चांगली संलग्नता मिळणार आहे. या मार्गिकेवरील वरळी स्थानक तयार झाले आहे. हे स्थानक वरळी प्रभादेवी दादर अशी अन्य कुठल्याही रेल्वेची उपलब्धता नसलेली संलग्नता देणार आहे. मेट्रो ३ ही राज्यातील पहिली भूमिगत मार्गिका आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरांना उत्तर व दक्षिण जोडणाऱ्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये सारिपूतनगर (आरे) ते बीकेसी उत्तर असा सुरू होणार आहे. तर दुसरा टप्पा बीकेसी दक्षिण ते कफ परेड, असा डिसेंबर २०२४ ला सुरू करणे प्रस्तावित आहे. याच दुसऱ्या टप्यात वरळी स्थानकाचा समावेश आहे. वरळी स्थानकामुळे दक्षिण मध्य मुंबईचा पश्चिम भाग एकमेकांशी जोडला जाणार आहे. सद्यस्थितीत प्रभादेवीहून वरळीला पोहोचण्यासाठी कुठलाही अन्य रेल्वे मार्ग नाही. रस्त्यावरील वर्दळयुक्त वाहतुकीद्वारे या भागात पोहोचावे लागते. मात्र वरळी स्थानकामुळे या भागात संलग्नता येणार आहे. ही मार्गिका वरळीत येताना दादर भागातील शितलामाता मंदिर व प्रभादेवी भागातील सिद्धिविनायक मंदिर स्थानकातून येणार आहे. त्यामुळे वरळी प्रभादेवी दादर, अशी संलग्नता हे स्थानक देणार आहे. एरवी वरळी ते प्रभादेवी हे अंतर कापण्यास अनेकदा अर्धा तासाचा कालावधी लागतो. तो या स्थानकामुळे काही मिनिटांवर येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा