साहस फाउंडेशन विश्वस्तपदी अॅड नकुल पार्सेकर यांची नियुक्ती..

साहस फाउंडेशन विश्वस्तपदी अॅड नकुल पार्सेकर यांची नियुक्ती..

सिंधुदुर्ग :

साहस डिसेबिलिटी रिसर्च अँड केअर फाउंडेशन कोल्हापूरच्या विश्र्वस्थपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक आणि अटल प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड नकुल पार्सेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या फाउंडेशनची स्थापन जेष्ठ समाज सेविका डॉ.नसीमा हुरजुक यांनी केलेली असून सहसाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांचा वर आहे . तसेच असे विविध क्षेत्रात कार्यरत असलेली मंडळी साहसचे पदाधिकारी असून या फाउंडेशन चा  उद्घाटनाचा कार्यक्रम मा.श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभ हस्ते शनिवार दिनांक १६ रोजी सायं ४.०० वाजता केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे.

तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालक मंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील, तसेच खासदार श्रीनिवास पाटील आणि खा. धैर्यशील पाटील, खा. संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील उर्वरित विकास मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ.योगेश जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा