You are currently viewing सावंतवाडी-भटवाडी येथे कौले काढून घरफोडी…

सावंतवाडी-भटवाडी येथे कौले काढून घरफोडी…

सावंतवाडी-भटवाडी येथे कौले काढून घरफोडी…

अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल…

सावंतवाडी

येथील भटवाडी-काजरकोंड परिसरात राहणाऱ्या अरविंद सहदेव केरकर यांच्या घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने चार हजाराची रोकड पळवली. विशेष म्हणजे त्याने दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात यश न आल्यामुळे कौले काढून त्यांनी घरात प्रवेश करून ही चोरी केली.
ही घटना काल रात्री साडेदहा वाजता सुमारास उघड झाली. दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. केरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भटवाडी-काजरकोंड परिसरात केरकर यांचे घर आहे. काही कामानिमित्त ते काल रात्री बाजारात गेले होते. यावेळी घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाची कुलूप तोडले. परंतु आतुन दुसरे कुलूप असल्यामुळे त्याला दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्याने बाजूला असलेले शिडी घेऊन छपरा वरील कौले काढली आणि आत प्रवेश करून कपाट फोडून चोरी केली मात्र मुख्य कपाट फोडण्यास त्याला अपयश आल्यामुळे त्यांचे दागिने सुखरूप राहिले .
दरम्यान रात्री दहा वाजण्याच्या सुमारास केरकर घरी आल्यानंतर त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे कळले. त्यांनी बाजूला राहणारे सागर कांदळगावकर, अमोल शितोळे, साई केरकर यांना कल्पना दिली. तसेच पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी हवालदार हनुमंत धोत्रे व त्यांचे सहकादी दाखल झाले. त्यांनी तपास केला. यावेळी संबंधित चोरटा हा कौले काढून घरात उतरल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे तपासी अंमलदार प्रमोद पाटील यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा