You are currently viewing कुडाळ – कणकवली  महामार्गावर टेम्पोची गाईला धडक: गाय जागीच ठार

कुडाळ – कणकवली  महामार्गावर टेम्पोची गाईला धडक: गाय जागीच ठार

कणकवली

कुडाळच्या दिशेने जात असताना अशोक लेलँड च्या टेम्पो ची महामार्गावरून जात असलेल्या गाईला जोरदार धडक बसून या धडकेत गाय जागीच ठार झाली. तर अपघातात टेम्पोचे देखील मोठे नुकसान झाले. हा अपघात जानवली रतांबि व्हाळा नजीक काल शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर वाहतूक पोलीस दिलीप पाटील, सुनील निकम, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अपघाताचा पांडुरंग पांढरे यांनी रात्री पंचनामा केला.

या अपघातात टेम्पो चालक मारुती शिवाजी वॉस्टर कुडाळ हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. वाहतूक पोलिसांनी व होमगार्डनी वाहतूक सुरळीत केली. जानवली मारुती मंदिर नजीक आज झालेल्या कंटेनरच्या अपघातानंतर जानवली महामार्गावर सलग एकाच दिवशी झालेला हा दुसरा अपघात आहे. अपघातात गाय जागीच ठार झाल्याने जानवलीतील गाय मालकाचे देखील मोठे नुकसान झाले

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 12 =