सावंतवाडी नगरपरिषदेचे कोकण स्तरावर यश, ५० लाखाचे बक्षीस…
सावंतवाडी
राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियानामध्ये सावंतवाडी नगरपालिकेला कोकण स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या अंतर्गत लोकसंख्येच्या आधारे त्यांना ५० लाखाचे बक्षीस प्राप्त झाले आहे. याबाबतची माहिती सावंतवाडीचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दिली. यात प्रथम श्रीवर्धन नगरपरिषद, द्वीतीय सावंतवाडी नगरपरिषद आणि तृतीय अलिबाग नगरपरिषद आली आहे, असे त्यांनी सांगितले.