जानवली सखलवाडी येथील राष्ट्रीयस्थरावरील कब्बड्डीपट्टू गौरव राणे यांना शिवसेनेचे आर्थीक सहकार्य.

जानवली सखलवाडी येथील राष्ट्रीयस्थरावरील कब्बड्डीपट्टू गौरव राणे यांना शिवसेनेचे आर्थीक सहकार्य.

जानवली सखलवाडी येथील चि.गौरव राणे हा 20 वर्षीय यूवक राष्ट्रीयस्तरावर आपली चमक दाखवत आहे. गौरव छत्तीसगड, तेलंगणा, गोवा येथे राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगीरी करतो आहे. गौरवला प्रो कब्बडीतही मागणी आहे. परंतू सामान्य शेतकरी कुटूंबातील या गुणवान खेळाडूला आर्थीक परिस्थीतीमूळे गुणवत्ता असुनही स्पर्धेत भाग घेणे कठीण झाले आहे.याची दखल घेत शिवसेना उपतालूका प्रमूख भालचंद्र दळवी यांनी उपजिल्हा प्रमूख राजू शेट्ये यांच्या सहकार्याने
शिवसेना नेते, जिल्हा बॅक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आर्थिक सहकार्य केले. व गौरवला गोव्याला
जाण्यासाठी शुभेच्छा देवून! गौरवला या पूढील सहकार्यासाठी शिवसेना सदैव तत्पर राहीलच समाजातील स्तरातील मान्यवरांनी अशा गुणवंत खेळाडूला आर्थीक पाठबळ देण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी उप जि.प्रमूख शेट्ये, यूवासेना समन्वयक राजू राठोड, नगरसेवक सुशांत नाईक, उद्योजक भास्कर राणे, रामदास विखाळे, पारकर उपस्थीत होते. शिवसेना नेते अतूल रावराणे व संदेश पारकर यांनी गौरव राणे यांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा