डी.एडच्या शासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी विशेष फेरी

डी.एडच्या शासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी विशेष फेरी

सिंधुदुर्गनगरी 

सन 2020 – 21 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका  प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या. तथापी अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येतील. सदरची प्रवेश प्रक्रिया पुढील प्रमाणे राबविण्यात येणार असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेश होईल. दिनांक 11 जानेवारी 2021 ते 14 जानेवारी 2021 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, दिनांक 11 जानेवारी 2021 ते 15 जानेवारी 2021 पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करणे, दिनांक 11 जानेवारी 2021 ते 16 जानेवारी 2021 विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगिन मधून प्रवेश घ्यावयाचे अध्यापक विद्यालय निश्चित करून स्वतःचे प्रवेशपत्र काढून घेणे, दिनांक 11 जानेवारी 2021 ते 20 जानेवारी 2021 प्राचार्य, संबंधित अध्यापक विद्यालय यांनी प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रांची पडताळणी करून स्वतःचे लॉगिन मधून विद्यार्थ्यांना ऑनलाईन ॲडमिट करून घेणे. सदर प्रवेशासाठीची पात्रता पुढील प्रमाणे आहे. शैक्षणिक पात्रता – इयत्ता 12 वी उत्तीर्ण, खुल्या प्रवर्गासाठी किमान 49.5 टक्के व खुला संवर्ग वगळून इतर संवर्गासाठी किमान 44.5 टक्के गुणांसह, प्रवेश अर्ज शुल्क खुल्या संवर्गासाठी 200 रुपये व खुला संवर्ग वगळून इतर सर्व संवर्गांसाठी 100 रुपये. विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करू शकतात असे अध्यक्ष, राज्यस्तरीय डी.एल.एड.प्रवेश निवड, निर्णय व सनियंत्रण समिती पुणे तथआ संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे हे कळवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा