You are currently viewing गंगौघ….पावित्र्यातील शिवत्व , सत्यत्व..यांची अद्वितीय परंपरा

गंगौघ….पावित्र्यातील शिवत्व , सत्यत्व..यांची अद्वितीय परंपरा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम लेख*

 

*गंगौघ….पावित्र्यातील शिवत्व , सत्यत्व..यांची अद्वितीय परंपरा.*

****************************

काही दिवसांपूर्वी मी *जाणिवा आणि नेणिवा* या विषयावर एक लेखांक लिहिला होता. खरंतर जन्म आणि जन्माची सांगता आणी ते कालचक्र अतर्क्य आहे आणि ते एक सुंदर सत्य आहे. ते जर समजण्याचा , उमजण्याचा प्रयत्न केला , विचार केला तरी *अगाध ईश्वरीय तत्वाची अनुभूती येते* आणि अनाकलनीय , अतर्क्य शाश्वत सत्य समोर येते हा सिद्धांत असावा असे मला वाटते.

काव्य असो लेखन असो किंवा कुठलीही कलासाधना असो तो एक चिंतनात्मक , कलासक्त विचार असतो त्या संस्कारक्षम विचारातुन जीवनाची नैतिक जीवनमूल्ये , संस्कार रुजले जातात.

 

*रुजणे ही गोष्ट नैसर्गिक आहे.*

या सृष्टीत रुजलेले जे नैसर्गिक वैभव आहे , ऋतुऋतूंचा दैदीप्यमान असा आविष्कार आहे , कल्याणकारी दृष्टांत आहे आणि तो निर्विवाद *ईश्वरदत्त* आहे. *याचे शब्दसाहित्यात वर्णन करताना प्राचीन वेदकालीन प्रचलित वाङ्मयामध्ये अनेक श्रीमंत शब्दांची निर्मिती झाली आहे. हेच दिसून येते.*

*बोलीभाषा हे अंतरीचे मनभाव व्यक्त करण्याचे एक सुंदर माध्यम असून ते वैश्विक आहे*

अशा शब्दांची सूची , व्याप्ती , अर्थ आणि त्यातल्या जाणीवा नेणिवा या अत्यन्त अर्थपूर्ण आहेत त्याची आपल्या मनाला – अंतर्मनाला ओळख होणे अत्यन्त गरजेचे आहे.

 

*मुळात संस्कार हे अत्यन्त महत्वाचे असतात.* ते सहवासाने घडतात आणि असा सहवास लाभणं हा संचिती प्रारब्धयोग असतो . हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे.

खरं तर हा विषय म्हणजे एक समृद्ध वैचारिक प्रबंध आहे त्याचे स्वतंत्र पुस्तक होईल. आजकाल मुळातच वाचनसंस्कृती संपुष्टात येत चालली आहे असे आढळून येते. हे मानवी वैचारिकतेचे अवमूल्यन आहे असे मला वाटते.

 

*कला हे कलाकाराचे चैतन्य काळीज असते म्हणूनच* तरच कलेचे मूलभूत आत्मतत्त्व ती कला वृद्धिंगत करत असते आणि अशी तन्मयी कला ही कलाकारांना इप्सित कलापूर्तीचे उत्कट ध्येय साध्य करून खरी फलश्रुती देते हा इतिहास आहे.

 

*ग्रंथ माणसे घडवतात*…

वाचन , मनन , चिंतन , अभ्यास , प्रबोधन यातून आत्मशुद्धी होते. हे निर्विवाद सत्य आहे. *जीवनाचा अर्थ कळतो* प्राचीन सर्वच धर्मग्रंथ आणि वाङ्मय याची साक्ष आहे.

आणि या सर्वच ग्रंथ, पुराणकथा , आणि धार्मिक विवेचनात्मक साहित्यातून आपल्याला प्रचिती येते.

*साहित्यात* ” *ब्रह्माण्ड , त्रैलोक्य , ब्रह्मास्त्र , अतर्क्य , गंगौघ , कृपाळु , कृपावंत , स्वान्तसुखाय , दैवाधीन , कल्याणकारी , ईश्वरीय , पुण्यदा , पुण्यवंत , कालचक्र , भगवन्त , अशा प्रकारचे अनेक शब्द साहित्यात दिसून येतात. *त्याचा गर्भितार्थ आपल्याला समजला पाहिजे , त्याची उकल करून घेतली पाहिजे.. असे अनेक समर्थ शब्द आहेत.*

 

साहित्य हे वैश्विक आहे म्हणजेच सर्वभाषिय आहे. या सर्व वैश्विक वाङ्मयामध्ये विविध विषयावर विपुल लेखन आपल्याला विविध भाषेमध्ये आढळून येते.

 

*वाङ्मयिन प्रबोधनात्मक श्रीमंती ( वैचारिक )* ही फार मोठी गोष्ट आहे.*

 

*भारतीय संस्कार आणि भारतीय ग्रंथसंपदा , भारतीय कलासंस्कृती आज सर्वार्थाने जगतात सर्वत्र श्रेष्ठ आहे. याचा आपल्याला अभिमान असणे गरजेचे आहे.*

 

*भारतीय परंपरेत भरतभूमीत देवदेवतांचे वास्तव्य होते इथे अनेक संतमुनी ऋषी होवून गेले आहेत हे वास्तव आहे. अनेक ज्येष्ठ विचारवंत , साहित्यिक , कवी , शास्त्रज्ञ, देशभक्त , क्रांतिकारक ही भारताची अध्यात्मिक सांस्कृतिक वैभवशाली ओळख आहे….*

 

*हे आपल्या भारतीयांचे आहोभाग्य आहे.* आणि त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.

 

*माझ्या 1.साहित्य शिंपल्यातील मोती . 2. संस्कार ज्योत .3. साहित्यिकांच्या सहवासात. 4.संस्कार शिदोरी अशा पुस्तकांतून मी या विषयावर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. साहित्यिकांच्या सहवासात या पुस्तकात मी मला भेटलेल्या अनेक आदर्श अशा साहित्यिक कवी यांच्या बाबत माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत..*

गुरुवर्य कै. दत्तोवामन पोतदार , कै. लोककवी मनमोहन नातू , कै.आचार्य अत्रे , कै. शांताबाई शेळके , कै.प्रा .दा .सी.देसाई , डॉ. आनंद यादव , कै. प्रा.शिवाजीराव भोसले. कै. प्रा.बलवन्त देशमुख , कै. डॉ. द.भि. कुलकर्णी तसेच प्रा. द.ता.भोसले यांचा प्रदीर्घ जवळून सहवास लाभला.

 

*तर आज पुण्यातील ज्येष्ठ मार्गदर्शक साहित्यिक गुरुवर्य डॉ.न.म.जोशी , प्रा. सू. द.वैद्य यांचा मला सहवास लाभतो हे माझे परमभाग्य आहे. यांचा माझा सदैव संवाद असतो.*

 

*त्यांच्या संभाषणसंवादातून अनेक सुंदर शब्द मला भेटतात आणि ते माझ्या साहित्यात उतरतात हे वास्तव आहे.*

 

*म्हणून माझ्या प्रत्येक रचनेत किंवा लेखनात अद्भूत , अर्थपूर्ण शब्दांची नांदी असते. त्यापैकीच नुकत्याच लिहिलेल्या रचनेत ” गंगौघ , ब्रह्माण्ड , त्रैलोक्य* ”

*या शब्दांबद्दल मला अनेक प्रतिक्रीया आल्या देखील…*

 

खरं तर शब्द अन शब्दार्थ अंतरात विरघळावे लागतात मग अंतरीच्या शब्दभावनांना उत्स्फूर्त दाद मिळाली की लेखनाचे सार्थक होते आणि लेखनाचा प्रवास सुकर सुरू आहे असे जाणवते.

 

आणि ज्यांच्यामुळे अशा अर्थपूर्ण शब्दसंस्कारांचे भावनिक संस्कारांचे शिंपण झाले त्यांच्या बद्दल मनात सदैव कृतज्ञता जागृत रहाते.

 

नेहमी प्रमाणे आजही सकाळी प्राचार्य सू. द. सरांचा फोन आला मला म्हणाले… *तुमचा आजचा गंगौघ हा शब्द खूपच सुंदर आहे..त्या शब्दात अद्वितीय परंपरा आहे..अभिमान आहे ..पावित्र्य..भक्तीचा ओघ सौन्दर्य ..शिवत्व.. सत्यत्व.. गुणदर्शकता आहे…*

तुम्ही आता तुमचा

*गंगौघ* या नावाचा काव्यसंग्रह *लौकरच प्रकाशित करा..*

तर

माझे बालमित्र श्रीकांत दिवशिकर यांनीही अशा शब्दांच्या बाबतीत माझ्याशी मुक्त चर्चा केली याचा मला खुपच आनंद झाला.

या चर्चासंवातुन मला आज प्रकर्षाने कविवर्य कै. बा. भ. बोरकर यांची आठवण झाली. ” *जिणे गंगौघाचे पाणी* या रचनेची आठवण झाली.

त्या कवितेतून परमार्थातला परमानंद प्रत्ययास येतो.

 

*साहित्यिक , कवी, कलाकार यांची प्रामाणिक साधना , तपश्चर्या ही सात्विक समाधान देत असते. आणि ती तपस्या अभंग असते….*

****************************

*इती लेखन सीमा…*

*©️वि.ग.सातपुते.* (विगसा )

*अध्यक्ष:-महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे (महाराष्ट्र)*

*📞(9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा