कोविड विषयक नियमांचे पालन करून सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार…

कोविड विषयक नियमांचे पालन करून सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार…

सिंधुदुर्गनगरी

प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, बहुचित्रपटगृहे, नाटकगृहे सुरू करणे, तसेच बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम यांना अटी व शर्तींच्या अधीन राहून व विहित कार्यचालन कार्य पद्धतीचा अवलंब करून परवानगी देण्यात आली आहे.
संबंधीत सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तसेच नाटक, लोककला जसे दशावतार, यांना स्थानिक स्तरावरून परवानगी घेऊन सादरीकरण करता येणार आहे. याबाबत शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागातर्फे आदेश देण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा