फोंडाघाट येथे 2 लाख 52 हजार चा अवैध दारूसाठा जप्त

फोंडाघाट येथे 2 लाख 52 हजार चा अवैध दारूसाठा जप्त

उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत एकाला अटक

कणकवली

गोवा बनावटीची दारू घरात साठवणूक केल्याप्रकरणी कणकवली फोंडा घाट येथे एकावर राज्य उत्पादन शुल्क अधिकार्‍यांनी कारवाई केली आहे. त्याच्याकडून तब्बल 2 लाख 52 हजार चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रसाद महादेव नरम राहणार फोंडाघाट , हवेली नगर असे आरोपीचे नाव असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की फोंडा घाट हवेली नगर रहिवाशी प्रसाद महादेव नरम याने आपल्या घरात दारूचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क पथकाला मिळाली होती. त्यानुसार अधीक्षक बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गणेश जाधव व सहकाऱ्यांनी या ठिकाणी छापा टाकला. यावेळी दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, स्नेहल कुवेस्कर जगन राणे आदींनी सहकार्य केले.या छाप्यात गोवा बनावटीच्या दारूचा अवैध साठा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला असून तब्बल 2 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच प्रसाद महादेव नरम यालाही अटक करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा