You are currently viewing भाजपा युवा नेते संदिप गावडे याच्या माध्यमातून वेंगुर्लेतील ४६ भजनी मंडळांना प्रोत्साहनात्मक भजन साहीत्याचे वाटप

भाजपा युवा नेते संदिप गावडे याच्या माध्यमातून वेंगुर्लेतील ४६ भजनी मंडळांना प्रोत्साहनात्मक भजन साहीत्याचे वाटप

*भाजपा युवा नेते संदिप गावडे याच्या माध्यमातून वेंगुर्लेतील ४६ भजनी मंडळांना प्रोत्साहनात्मक भजन साहीत्याचे वाटप*

वेंगुर्ले

भारतीय जनता पार्टी व भाजप नेते श्री.‌संदीप एकनाथ गावडे यांच्या मार्फत सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला या तीनही तालुक्यातील भजनी मंडळांना प्रोत्साहनपर मोफत भजनी साहित्य संच वाटप करण्यात आले . आध्यात्मिक चळवळीला बळ देण्यासाठी गावातील भजन मंडळांना स्वखर्चातून भजन साहित्य संच देण्याचे कार्य श्री. संदीप गावडे यांनी पालकमंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ केला .
वेंगुर्ले तालुक्यातील भजनी मंडळांना भाजपा तालुका कार्यालयात भजन साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळी मार्गदर्शन करताना संदिप गावडे म्हणाले कि भाजपा हा अध्यात्मिक गोष्टींशी निगडित आहे , त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासुन राज्यातील देवेंद्रजी फडणवीसां पर्यंत सर्वच नेते धार्मिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देतात . म्हणून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात स्वखर्चाने भजन साहित्य देत असल्याचे सांगीतले .
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , मच्छिमार नेते वसंत तांडेल व दादा केळुसकर , माजी सभापती प्रीतेश राऊळ , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर , ओबीसी सेलचे शरद मेस्त्री , शक्तिकेंद्र प्रमुख सुधीर गावडे , खानोली सरपंच सुभाष खानोलकर , बाबु भोसले , सुनिल घाग , कार्तिकी पवार तसेच बुथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते .
______________________________
*संवाद मीडिया*

🏠🏠🏠🏠🏠🏠🏠

*🏠 SK 🏠*
*VASTU*
*CONSULTANT*

*🏘️🏘️ SK VASTU CONSULTANCY* 🏘️🏘️

*🔸We solve all problems related to Vastu*

*🔹We suggest solutions for Vastu Dosha*

*🔸We solve all Vastu Kundli related problems*

*_Vastu specialist in house, hotels, mall, school, college, showrooms, shop, factory, hospital_*🏥🏬🏘️🏢🏣

*Contact details:-*
📲9892009443
📲9930787451

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा