You are currently viewing मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची शासकीय तंत्रनिकेतन येथे मतमोजणी

मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची शासकीय तंत्रनिकेतन येथे मतमोजणी

प्रभारी तहसीलदार श्रीधर पाटील : एकूण ७५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

मालवण

मालवण तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात ४९ हजार १४५ मतदारांपैकी ३२ हजार ७८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात तालुक्यात ६६. ७१ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान तिरवडे ग्रामपंचायतीसाठी ८२.३४ टक्के तर सर्वात कमी मतदान ओवळीये ग्रामपंचायतीसाठी ५९.३४ टक्के एवढे झाले असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.

 


दरम्यान उद्या ता. २० रोजी शासकीय तंत्रनिकेतन येथे सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीच्या प्रक्रियेस सुरवात होणार आहे. २०, २०, ७ अशा तीन टप्प्यात ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार आहे. यात प्रथम तीन प्रभागांचा निकाल जाहीर होईल त्यानंतर सरपंच पदाचा निकाल जाहीर होईल. मतमोजणीसाठी २० पर्यवेक्षक, २० सहायक अन्य असे एकूण ७५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुपारी एक वाजेपर्यंत तालुक्याचे चित्र स्पष्ट होणार असल्याची माहितीही श्री. पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा