You are currently viewing खारेपाटण चेक पोस्टला जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली भेट

खारेपाटण चेक पोस्टला जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली भेट

कणकवली

कोकणात विशेष करून सिंधुदुर्गात यंदा गणेश चतुर्थीच्या सणाला मुंबईवरून येणाऱ्या गणेश भक्त प्रवासी तथा चाकरमान्यांची वाढती संख्या लक्षात घेता तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी खारेपाटण चेक पोस्ट येथे कार्यरत असलेल्या आरोग्य, महसूल आणि पोलीस प्रशासन यांच्या पथकाला तातडीची भेट देऊन पाहणी केली . यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या समवेत कणकवली पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.नितीन कटेकर उपस्थित होते. पोलीस अधीक्षक दाभाडे यांनी खारेपाटण चेक पोस्ट येथील आरोग्य व महसूल पथकातील कर्मचारी वर्गाशी संवाद साधला. व मार्गदर्शक सूचना कर्मचारी वर्गाला केल्या.तसेच मुंबई वरून येणाऱ्या चाकरमानी वर्गाच्या वाहनांच्या विविध पार्किंगच्या ठिकाणाची पाहणी करून गर्दी वाढणाऱ याची चोख दक्षता घेण्याच्या सूचना देखील त्यानी येथे कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी आरोग्य व महसूल कर्मचारी याना केल्या.

यावेळी खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे प्रमुख उद्धव साबळे, पोलीस कॉन्स्टेबल पराग मोहिते आदी उपस्थित होते. तर खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक, संकेत शेट्ये, सुकांत वरूनकर, महेश कोळसुलकर यांनी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचे खारेपाटण चेकपोस्ट येथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या गणेशभक्त प्रवाशासाठी खारेपाटण चेक पोस्ट येथे मोफत चहा व पाणी वाटप करणाऱ्या सुकांत वरूनकर यांचे अधीक्षक दाभाडे यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा