*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विजया केळकर लिखित श्री गजानन विजय सारांश*
*||श्रीगजानन विजय||*
*||सारांश*||
*— प्रार्थना —*
*श्री* मन् नारायण नारायण स्मरुनी
*ग* गनी आला दिनमणी
*जा* गी झला अवघी अवनी
*न* भी सूर रंगले
*नव-पल्लव डोलु लागले
*वि* विध रंगी विपुल फुले
*ज*रा थबकली, जल चमकले
*य*शाची गाऊ गाणी, नाचूया
*श्री* गजाननविजय वाचूया
*******************************
****** (१ ) *****
प्रथम नमून गजवदना |
मग गाऊ सरस्वती वंदना |
भक्तिभावे करु आराधना |
हीच असासावी कामना ||१||
रामचंद्र पाटलांनी ईप्सित |
दासगणूस केले कथित |
तेच महाराजांचे चरित्र |
‘ श्री जाननविजय ‘ सचित्र ||२||
बंकटलाल नि दामोदरपंता |
प्रथम पाहिलेया संता |
उष्ट्या अन्नाची शिते वेचिता |
भासला पूर्ण ज्ञाननसविता ||३||
ठरले थोर भाग्याचे धनी |
माघ वद्यसप्तमी दिनी
हाळातील पाणी पिऊनी |
गेले,ईश्वररुपाची जाण देऊनी ||४||
**************************************
***** ( २ ) *****
नुरली रुची अन्नावरीखास |
बंकटे चित्तांतरी भेटीची आस |
भास होईआसपास |
ऐसा लागे बहुध्यास ||१||
आनंदे बैसलु होती *स्वारी* |
फरसावरी सामोरी |
दिली माळीणीची झुणक-भाकरी |
आणि खिशातली सुपारी||२||
नाल्याचे पाणी स्फटिकासम |
वृत्ती पालटे अशी एकदम |
योगेश्वराचे सान्निध्य |
ठरले हेच आराध्य ||३||
किर्तन श्रवण, मिळे शिकवण |
झाले क्षेत्र बंकटसदन |
होता मंगल स्नान, सुग्रास भोजन |
आल्या दिंड्या दोन, चाले भजन ||४||
भजन ‘गण गण गणात बोते ‘ |
‘अभिधान’ गजानन ‘ दिले त्याते |
दिनचर्येचा नियम नसे |
पण भाविकास आदर्श असे ||५||
****************************************
***** ३ *****
नवस फेडण्या काशीचा गोसावी |
येऊन (चूप) कोपर्यात विसावी |
त्रिकालज्ञ बोलावती जवळी |
प्याले त्याच्या झोळीची पोटळी ||१||
गांजा पिणे जाण ते |
मायेने लाड पुरविणे होते ते |
गाती अन्य अन्य रागातून पदाते |
खरेच अति थोर ते | |२ ||
जानरावाच्या अंतसमया |
चरणतीर्थ पाजिलै |
आरोग्यता लाभली त्या पाया |
गंडातर मृत्यूचे चुकले ||३ ||
साधु नसल्या वेषधारी |
माती होय कस्तुरी |
भौतिक,दैविकमृत्यू टळता |
आध्यामिक मृत्यू अटळ असता ||४||
दंभे भरला विठोबा घाटोळ |
घातला त्याने घोळ |
दर्शना उठविला स्वामिराव |
अन् खाई काठीचे घाव ||५||
संतापासी राहता |
विचारा ठेवावे जागृत |
अवघ्या भाविकांकरता |
तो चि तारक भवाब्धित ||६||
**************************************
***** ४ *****
चिलिमीसाठी विस्तव |
मागे काही कारणास्तव |
ना म्हटले, काही कारणास्तव |
अळ्या पडल्या चिंचवण्यात ||१||
माव केली मिटली भ्रांत |
सोनाराने घातले दंडवत |
अनाथांचा हा वाली |
अपराध कृपाकृशाने जाळी ||२||
चंदु मुकिनासी मागितले |
उतरंडीचे दोन कान्हवले|
कशी विसरली ती गृहिणी |
आठवण देई संतवाणी ||३||
अनुतापे आला माधव शेगावी |
अन्नाविण राहून बहु विनवी |
तुजवीण कोण ऐकेल रुदन |
वागलो शाश्वता विसरुन ||४||
भयंकर रुप दावून |
कथिले, काळाचे तू ही भोजन |
तरी नारायणाचे करी भजन |
चुकवी जन्म-मरण ||५||
शिष्याहाते केला |
थाट वसंत पूजेचा |
साधकासी दाविला |
पथ विमलशा हरिभक्तीचा ||६||
***************************************
***** ५ *****
स्वामी भटकत असता काननी |
बैसले शिवमंदिरी अरणी |
मायावी भूत,साधू की उपवासी |
नुमजेगुराखी बालकासी ||१||
अंती देव जाणून |
परम भावे केले भजन,पूजन |
घरां जाती दिवस मावळता |
येती गावकर्यासंगे,उगवता || २||
समाधीस्थ योगी जाणले |
पालखीत मारवीत आणले |
स्तवनी मग्न पिंपळगाव |
घेऊन मारुती मंदिरा धाव ||३||
उदासी बंकटसदनात |
भक्त ऊपोषित शेगावात |
गुरुमाऊलीचा ठाव लागला |
घरा आणली,साहूस पावला||४||
वैशाखमासी तापे बहु अर्क |
तरी शेतकामी ‘ भास्कर ‘ गर्क |
दिगंबर योगीराज झाला की याचक |
फसला रुपास, ना दिले उदक ||५||
विहीर उपजवी आशा थोडी |
बारा वर्षापासून ती कोरडी |
सहाय्ये आठवे जगजेठी |
क्षणात भरली, कृपा मोठी ||६||
साक्षात्काराची छडी |
भास्कराचे डोळे उघडी |
नदी भावाची वाहे दुथडी |
बदलली जीवन घडी ||७||
*************************************
*****६ *****
खाण्या मक्याची कणसे |
मळ्यात जमली कैक माणसे |
आगट्यांनी घेतला पेट |
मधमाशा आल्या द्याया भेट ||१||
पळती लड्डूभक्त घेऊन घोंगडी |
डोलती समर्थ लेऊन माशांची पासोडी |
निस्सीम भक्त येई धावोनी |
गुर्वाज्ञेने माशा गेल्या परतूनी ||२||
सोनारासना दिसले कांटे |
वायू रोधता निघाले कांटे |
कळला कळला अधिकार |
गजाननाचा जयजयकार ||३||
अकोटासी निबिड अरण्यासी |
विठ्ठलभक्त नरसिंगजीसी |
सांगे आचरता कर्म,भक्ती वायोग |
लागेल सच्चिदानंदाचा माग ||४||
शिवरगावी चंद्रभागेतिरी |
पंडित व्रजभूषणा सामोरी |
अजानुबाहू तेज:पुंज मूर्ति |
आशिर्वचने करती तप पूर्ती ||५||
रहावा परमहंस संन्यासी |
कैचा प्रापंचिकांच्या घरांसी |
श्रावण मासाच्या आरंभासी |
आला मारुती मंदिरासी ||६||
**************************************
***** ७ *****
पांच बंधू खंडू पाटलाचे |
उर्मट कां की जमेदार शेगावीचे |
हरीचे आव्हान संतास कुस्तीचे |
पेच घालणे,झाले पेचाचे ||१|||
झाला नतमस्तक |
झाली मार्दववाणी |
सबळ करण्या बालके |
ठेवावा वरदपाणि,बोले धूर्तपणी ||२||
इतर बंधू परीक्षा घेण्यास |
देती ऊसाचा मार संतास |
उमटले ना वळ अंगावर |
उमटले हसू योगी-मुखावर ||३||
पिळून काढला इक्षुरस |
पाजिला नव्हाळी पोरांस |
चकित खंडू,येता दर्शनास |
म्हणे गण्या,परी पार नसे प्रेमास ||४||
समर्थांची समर्थ वैखरी |
होणार कशी असत्यतरी?|
पुत्र होता खंडू कारणा |
घाली आम्र-रस भोजन ब्राह्मणा ||५||
कुतर्क सोडून |
होता एकचित्त |
‘ तो ‘ येतो धावून |
तारण्या भक्त ||६||
****************************************
***** ८ *****
शेगावी होती दुफळीबाई |
देशमुख-पाटलाठायी |
कृत्य करती स्वार्थापायी |
परी सत्यास भीता अनाठायी ||१||
उमगले खंडूस हे मनोमनी |
सारी स्वामींची करणु |
स्वामीस नेले स्वदनी |
भजू लागले आवडीने ||२||
ऋचा म्हणता जाण |
चुकले तैलंगी ब्राह्मण |
चुकीवर नको पांघरुण |
वेद म्हणून दावे आपण कोण ||३||
आले कृष्णाजीच्या मळ्यासी |
पाठोपाठ काही तीर्थवासी |
महंत तो करी निरुपणासी |
घेऊन’ नैनं छिन्दासी ‘श्लोकासी ||४||
स्वामी चिलीम पिण्यात मग्न |
जरी पलंगास लागला अग्न |
ब्रह्मगारीचा अभिमान जळाला |
शब्दपांडित्याचा माज गळाला ||५||
कृपा प्रसाद लाभला |
(पोटभर्या न व्हावे संत) बोध ऐकला|
स्वानंद सागरी हरखला |
विरक्तची झाला ||६||
****************************************
***** ९ *****
मोट्याच्या मंदिरी अंगणी |
द्वाड घोड्यास,चौ पायात निजूनी|
बध्द केले भजन साखळीनी |
गोविंदबुवास भेटले कैवल्यदानी ||१||
बाळापुरचे दोन गृहस्थ भले |
गाठ बांधून नवस विसरले |
महाराजांनी मग समजावले |
लबाडाचे हेतु न जाती पुरविले||२||
काम होता पाच वार्या करती |
वंदण्या तेथींचा नृपती |
राजयोगी जडजीवा उध्दरती |
हमेश आठवता निर्मळ चित्ती ||३||
रामदासी बाळकृष्ण करी वारी |
संगे त्याची अंतुरी |
चिपळी झांजेचा गजर |
जय जय रघुवीर….. ||४||
६० वर्षे झाली देहाला |
उत्सव करी आपुल्या घराला |
गजानन उभे ठाकले नवमीला |
‘ रामदास ‘ दिसले , केली लिला ||५||
✒️विजया केळकर
८६०५१३६५७१