कळसुली ग्रामपंचायत येथे मोफत दातांची तपासणी शिबिराचे आयोजन
कणकवली
कणकवली तालुक्यातील कळसुली ग्रामपंचायत व दिविजा वृद्धाश्रम असलदे यांच्या संयुक्त विद्यमाने कळसुली ग्रामपंचायत येथे डॉ.किसन गारगोटे मोफत दातांची तपासणी शिबिर शुक्रवार २१ मार्च रोजी सकाळी 9.00 ते 2.00 पर्यंत दात काढणे, दात साफ करणे, सिमेंट भरणे, रूट कॅनल तपासणी शिबिर होणार आहे.
तरी कळसुली गावातील ग्रामस्थांनी मोफत दातांची तपासणी शिबिरास उपस्थित रहावे असे आवाहन कळसुली ग्रामपंचायत वतीने करण्यात आले आहे.