You are currently viewing उज्जैनकर फाउंडेशन तर्फे प्राचार्य आर. पी. पाटील यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार

उज्जैनकर फाउंडेशन तर्फे प्राचार्य आर. पी. पाटील यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार

 

 

जे.ई.स्कूल व जुनिअर कॉलेज मुक्ताईनगर येथील कर्तव्यदक्ष प्राचार्य श्री आर. पी. पाटील सर हे नुकतेच 31 ऑगस्ट 2024 रोजी सेवानिवृत्त झाले ते 1996 मध्ये निमखेडी या ठिकाणी नवीन माध्यमिक विद्यालयांमध्ये विनाअनुदानित शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले तेव्हापासून सलग मुख्याध्यापक पदावर पाटील सर विराजमान होते. त्यानंतर त्यांची जे. ई. स्कूल व जुनिअर कॉलेज, मुक्ताईनगर येथे प्राचार्य पदी नेमणूक झाली तालुक्यातील सर्वात जुनी व सर्वात मोठी अशी ही नामवंत जे.ई.स्कूल व कॉलेज येथे त्यांच्या कार्य काळामध्ये अनेक मान सन्मान त्यांनी या विद्यालयाला प्राप्त करून दिलेत. विविध प्रकारचे उपक्रम सुद्धा त्यांनी सहज व कौशल्याने हाताळले व शिक्षक विद्यार्थी यांना वेळोवेळी त्यांचे प्रेरणादायी असे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त मुक्ताई मंदिरा जवळील भव्य सभागृहात संस्थेच्या चेअरमन एडवोकेट सौ. रोहिणीताई खडसे-खेवलकर त्याचप्रमाणे संस्थेचे आधारस्तंभ महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार श्री एकनाथराव खडसे संस्थेचे सचिव डॉ. सी. एच. चौधरी त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व मुक्ताईनगर तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक बंधू, भगिनी व प्राचार्य पाटील यांचे आप्तेष्ट मोठ्या संख्येने प्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी प्राचार्य श्री आर. पी. पाटील सर यांचा सपत्नीक सत्कार केला प्रसंगी नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथील ज्येष्ठ शिक्षक तथा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर यांनी सुद्धा प्राचार्य श्री आर. पी. पाटील सर यांचा शाल व गुलाब बुके देऊन सपत्निक सत्कार केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा