You are currently viewing “दीपोत्सव २०२३” व “एक दीप भारतमातेच्या शहीद वीर जवानांसाठी” आदरांजली कार्यक्रम संपन्न

“दीपोत्सव २०२३” व “एक दीप भारतमातेच्या शहीद वीर जवानांसाठी” आदरांजली कार्यक्रम संपन्न

*”दीपोत्सव २०२३” व “एक दीप भारतमातेच्या शहीद वीर जवानांसाठी” आदरांजली कार्यक्रम संपन्न*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावात स्वयंभू श्री देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधून कार्तिक अमावस्या, मंगळवार दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६:३० वाजता श्री सप्तेश्वर (स्वयंभू) महादेव मंदिर रेडी, तालुका वेंगुर्ला येथे १००१ दीप प्रज्वलित करून गावातील सामाजिक ऐक्य व बांधिलकी जपण्याचे उद्दिष्ट ठेवून *”दीपोत्सव २०२३”* हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पंचतत्व ग्लोबल मीडिया आयोजित, सतर्क पोलीस टाईम्स, भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, कोकण विभाग, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ,माऊली डी जे अँड डेकोरेटर यांच्या सहकार्याने आयोजित करीत असलेल्या दीपोत्सवाचे यंदाचे सातवे वर्ष असून या कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय सैन्यदलातील निवृृत सैनिकांचा सन्मान गेली सहा वर्षे केला जातो. यंदा ह्या संस्थेचे संघटक कै.श्री. राजन बापू रेडकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने सदर निवृत्त सैनिक सन्मानाचा कार्यक्रम संस्थेच्या वतीने न करता अत्यंत साधेपणाने सर्व भारतीय नागरिकांच्या तसेच पोलीस कर्मचारी,वाहतूक पोलीस कर्मचारी,सागरी सुरक्षा रक्षक ह्यांच्या उपस्थितीत १००१ दीप श्री सप्तेश्वर (स्वयंभू) महादेवाच्या मंदिरात प्रज्वलित करण्यात आले.
भारत देश हा स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्षी पदार्पण करत असतानाच भारतासाठी हौतात्म्य पत्करलेल्या ह्या शूर विरांची आठवण करीत “एक दीप भारत मातेच्या शहीद वीर जवानांसाठी” आदरांजली संस्थेच्या वतीने रेडीमधील महिलांनी स्वयंभू महादेवा चरणी दीप व पुष्प अर्पून पूजन करून पुरोहित श्री प्रसाद अभ्यंकर यांनी देशाच्या सीमांवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांच्या संरक्षणाचे तसेच सदर कार्यक्रम सामाजिक हित व ऐक्य जपले जाऊन पूर्ण होवो असे साकडे महादेवांचरणी घालून कार्यक्रमाची सुरुवात केली. ज्येष्ठ नागरिक मुरलीधर राऊळ,पोलीस कर्मचारी राहुल बर्गे,अजित जाधव,वाहतूक पोलीस कर्मचारी मनोज परुळेकर,गौरव परब,सागरी सुरक्षारक्षक आबा गोसावी ह्यांनी दीप व पुष्प स्मारक तसेच फोटोला अर्पून श्रद्धांजली वाहिली.
भारतमातेच्या शहिद झालेल्या वीर जवानांकरिता आदरांजली म्हणून पुष्पहार तसेच “एक दीप भारतमातेच्या वीर शहीद जवानांसाठी” स्मारकाला दीप प्रज्वलित करून वीर शहीद जवान तसेच संस्थेचे संघटक तथा ह्या दीपोत्सव कार्यक्रमाचे निर्माते कै.श्री.राजन बापू रेडकर ह्यांना 2 मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
पंचतत्व ग्लोबल मीडिया आयोजित सतर्क पोलीस टाईम्स, भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ व कै.श्री.राजन बापू रेडकर मित्रपरिवारातर्फे ह्या आयोजनात हॉटेल पारिजात रेडी, अरुण कांबळी,निलेश राणे,दिलीप साळगावकर भूषण मांजरेकर आशिष सुभेदार,रवींद्र राणे,दयानंद कृष्णाजी,प्रवीण भगत, सौरभ नागोळकर, ताता नाईक,राजेश सातोसकर,राजाराम चिपकर,संजय बांदिवडेकर,विराज राणे,रोहिणी राणे,संकल्प वाडकर,श्रेया राणे,श्रावणी राणे,सुवर्णा कांबळी,मंदार सुभेदार यांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा