You are currently viewing प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते डायल ११२ प्रणालीअंतर्गत जि. पोलिस दलातील ९ वाहनांचे लोकार्पण…

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते डायल ११२ प्रणालीअंतर्गत जि. पोलिस दलातील ९ वाहनांचे लोकार्पण…

संकटात सापडलेल्या नागरिकांना तात्काळ मदत मिळावी म्हणून डायल ११२ प्रणालीअंतर्गत जिल्हा पोलिस दलातील ९ वाहनांचे सोमवारी प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले यांच्या हस्ते भंडारा जिल्हा पोलिस मुख्यालय येथे लोकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमाला मा. जिल्हाधिकारी संदीप कदम, मा. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, मा. अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, मा. काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई आदी उपस्थित होते.

आपत्तीच्या परिस्थितीत टोल फ्री क्रमांक 112 डायल करून नागरिकांना या विशेष पथकाकडून मदत मिळू शकते त्यामुळे ही जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा