You are currently viewing कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत : के. मंजुलक्ष्मी

कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत : के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात याव्यात,तसेच जास्तीत-जास्त रुग्णांना बरे करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करण्यात यावेत,अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी आज इथं आढावा बैठकीत दिल्या आहेत.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, वंदना खरमाळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील मृत्युदर हा राज्याच्या मृत्युदरापेक्षा जास्त असल्याचं सांगून जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, सावंतवाडी तालुक्यात मृत्यूदर जास्त आहे. त्याची कारणे शोधून त्याचा अभ्यास करावा. सावंतवाडीतील मृत्यूदर कमी करण्यासाठी तालुका स्तरावरील अधिकारी व यंत्रणांनी नियोजन करून काम करावे, जिल्ह्याचा रिकव्हरी रेटही वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणांनी काम करावे. ज्या रुग्णांना घरी सोडले जात आहे. त्यांचा डाटा दररोज अपडेट करावा. कोविड केअर सेंटर इथं किमान कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा. नव्या कोरोना स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर सर्वच यंत्रणांनी सतर्क रहावे. जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या सर्व नागरिकांची माहिती त्यामध्ये स्थानिक व पर्यटक अशा दोन्ही प्रकारच्या लोकांची माहिती संबंधित यंत्रणांनी गोळा करावी. त्यासाठी योग्य तो समन्वय ठेवावा. उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामिण रुग्णालय स्तरावर पोस्ट कोविड ओपीडी सुरू करावी. गर्दीच्या ठिकाणांवरील व्यापारी तसेच रिक्षा चालक, बसचालक, हॉटेल मधील कर्मचारी यांची कोविडची चाचणी करण्यासाठी संबंधितांच्या संघटनांशी चर्चा करून तसे नियोजन करावे.

यावेळी लसीकरणाच्या नियोजनाचाही आढावा जिल्हाधिकारींनी घेतला. माकडतापाचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 6 =