You are currently viewing सुरक्षारक्षक समितीकडून सुरू असलेले आंदोलन चौथ्या दिवशी मागे…

सुरक्षारक्षक समितीकडून सुरू असलेले आंदोलन चौथ्या दिवशी मागे…

सिंधुदुर्गनगरी

आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले चार दिवस सुरू असलेले ठिय्या आंदोलन आज अखेर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक व राष्ट्रवादीचे नेते काका कुडाळकर यांच्या उपस्थितीत सहाय्यक कामगार आयुक्त रत्नागिरी यांच्याशी चर्चा करण्यात आली. तब्बल अडीच तास झालेल्या चर्चेत काही मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्याचा निर्णय झाला. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − 9 =