कळसुली विभाग प्रमुखपदी चंद्रहास उर्फ बबली राणे यांची नियुक्ती
उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नियुक्ती; वैभव नाईक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
कणकवली :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कळसुली विभाग प्रमुखपदी माझी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी ही नियुक्ती जाहीर केली. आज आयोजित कार्यक्रमात बबली राणे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांच्यासह प्रमोद कावले, प्रदीप तळेकर, नितीन धुरी, बबन देसाई, दशरथ शिंदे, बंड्या भुजबळ, दिलीप तळेकर, पांडुरंग शिंदे, यशवंत चव्हाण, प्रकाश परब, मुरलीधर परब, महादेव राठवड, प्रमोद सावंत, राजू राणे, रवी परब, अनंत राणे, रवी सावंत, शिरीष घाडीगावकर तसेच विभागातील बहुसंख्य शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नियुक्तीनंतर कार्यकर्त्यांनी चंद्रहास उर्फ बबली राणे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील राजकीय व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कळसुली विभागात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याची भावना यावेळी राणे यांनी व्यक्त केली.
