फणसगाव येथील वीज चोरीला पाठीशी घालणाऱ्या अभियंता व अधिकाऱ्यांवर कारवाई करा…
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्युत पुरवठा सुरळीत ठेवा आमदार नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..
देवगड
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवा देवगड शहर भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक चाकरमानी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येत असतात या काळामध्ये विद्युत पुरवठा खंडित होऊ नये याची काळजी घ्या.यापूर्वीचे देवगडचे उपकार्यकारी अभियंता शेख यांनी चांगले काम करून जनतेवर छाप पाडली होती.त्यांच्या काळात वीज वितरण विभागाच्या समस्या तात्काळ मार्गी लागत असल्याने तक्रारीचाही ओघ खूप कमी होता. मात्र आता त्यांच्या कारकिर्दी मधील व आताच्या कारकिर्दीमधील सुरू असलेल्या कामांमध्ये मोठा फरक जाणवत असल्याची नाराजी आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली व सद्या कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता लिमकर यांना तुमच्या कडूनही शेख यांच्यासारख्याचं चांगल्या कामाची अपेक्षा देवगड मधील जनतेला अपेक्षित असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले.
आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये देवगड तालुक्यातील महावितरणचे ग्राहक सरपंच यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये आमदार नितेश राणे यांनी बोलताना वरील सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे फणसगाव परिसरामध्ये झालेल्या वीज चोरी बाबत दुर्लक्ष करणाऱ्या अभियंता व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या कोणत्याही परिस्थितीत वीज चोरी खपवून घेऊ नका असा सल्लाही त्यांनी या बैठकीत दिला.
आजच्या बैठकीमध्ये घरावरून येणारा विद्युत वाहिन्या, पोल शिफ्टिंग, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गंजलेले पोल बदलणे तसेच शेती जमिनीत असलेले पोल बदलणे याची मागणी गावोगाव असलेल्या सरपंच व वीज ग्राहकाने केली. आमदार नितेश राणे यांनी याबाबत आराखडा बनवून तातडीने पोल बदलण्याचे काम हाती घ्या अशा सूचना दिल्या आहेत.