You are currently viewing वेंगुर्ले बसस्थानक व शिरोडा बसस्थानकाची सांगली विभाग स्वच्छता कमिटीकडून तपासणी..

वेंगुर्ले बसस्थानक व शिरोडा बसस्थानकाची सांगली विभाग स्वच्छता कमिटीकडून तपासणी..

वेंगुर्ले बसस्थानक व शिरोडा बसस्थानकाची सांगली विभाग स्वच्छता कमिटीकडून तपासणी..

वेंगुर्ले

राज्यपरीवहन महामंडळामार्फत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धे अंतर्गत वेंगुर्ले आगार व वेंगुर्ले बस स्थानक तपासणीस आलेले सांगली विभागाच्या पथकाचे वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी वेंगुर्ले बसस्थानकावर स्वागत केले.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून राज्यातील ३१ जिल्हयातील राज्य परीवहन महामंडळाची आगारे व बसस्थानके यांची तपासणी व्हावी. प्रवाश्यांना सेवा व सुविधा मिळतात कि नाही. याबरोबर आगार व बसस्थानकांत गाड्यासह परीसराची स्वच्छता रहाते कि नाही. याची दरवर्षी पहाणी व्हावी. व त्या दृष्टीने प्रवाश्यांना सोयी सुविधा कमतरता असलेल्या भागात त्या देण्याच्या उद्देशाने राज्यपरीवहन महामंडळामार्फत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धात्मक स्वरूपात राबविण्यात येत आहे.

या स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धेत सहभागी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 18 बस स्थानकांची तपासणी या सांगली विभागाच्या समिती मार्फत सुरु आहे. आज मंगळवारी वेंगुर्ले तालुक्यातील वेंगुर्ले बस स्थानक व शिरोडा बस स्थानक सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या सांगली विभागाच्या सर्वेक्षण समितीचे प्रमुख सांगली विभाग नियंत्रक सुनील भोकरे, विभागीय अभियंता सुशांत पाटील, सांख्यिकी अधिकारी अनिल पार्टे, कामगार अधिकारी प्रवीण पाटील यांचे वेंगुर्ले बस स्थानकावर वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्या समवेत प्रवासी संघटना प्रतिनिधी राधाकृष्ण वेतुरकर, या समितीचे प्रतिनीधी पत्रकार भरत सातोस्कर, प्रवासी प्रतिनिधी प्रा. वैभव खानोलकर आदी उपस्थित होते.

या स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धेत वर्षभरात वेंगुर्ले आगाराच्या अधिपत्याखाली येणाऱ्या वेंगुर्ले बस स्थानक व शिरोडा बस स्थानक या बस स्थानकातील परिसर, बसेस, वेंगुर्ले आगार परीसर, बस स्थानक स्वच्छतेबरोबरच पर्यावरण पूरक वसुंधरे बाबत केलेले काम, प्रवाशांसाठी केलेल्या सेवा सुविधा तसेच अन्य बाबी यांची पाहणी या समितीने प्रत्यक्ष जागेवर जात केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =