You are currently viewing पारंपरिक लोककला दशावतार चालक- मालक बहुउद्देशीय संघ यांच्या अनेक मागण्यांच निवेदन शासन दरबारी…..

पारंपरिक लोककला दशावतार चालक- मालक बहुउद्देशीय संघ यांच्या अनेक मागण्यांच निवेदन शासन दरबारी…..

उपप्रादेशिक अधिकारी, पोलीस अधीक्षक, तसेच डेप्युटी कलेक्टर यांना विविध मागणीसाठी दिले निवेदन…….

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्गाची पारंपारिक असणारी दशावतारी लोककला जपण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या पासिंग च्या वेळी आरटीओ ऑफिस कडून होणाऱ्या जाचक अटी कमी कराव्यात तसेच व्यवसाय कर व इतर करां करांमध्ये सूट मिळावी म्हणून उपप्रादेशिक अधिकारी सिंधुदुर्ग यांना त्याचप्रमाणे कोरोना महामारिच्या काळात बंद असलेली कोकणातील नामवंत लोककला दशावतार लवकरात लवकर सुरू करावी रुढी परंपरेनुसार सुरू असलेल्या येणाऱ्या नवरात्र किंवा जत्रोत्सवा पर्यंत दशावतार सुरू होण्यासाठी सन्मानिय पोलीस अधीक्षक श्री दाभाडे आणि डेप्युटी कलेक्टर श्रीमती साठे यांना यावेळी निवेदन देण्यात आलं. यावेळी जिल्ह्यातील दशावतार लोककला चालक-मालक बहुउद्देशीय संघाचे प्रमुख पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + nineteen =