सेनेच्या गद्दारीमुळे आघाडीत बिघाडी

सेनेच्या गद्दारीमुळे आघाडीत बिघाडी

तळवडे येथे कॉंग्रेस राहणार महाविकासआघाडी पासून अलिप्त – सच्चिदानंद बुगडे

सावंतवाडी

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने गद्दारी केल्याने तळवडे ग्रामपंचायतीत कॉंग्रेस ने महाविकास आघाडी पासून अलिप्त राहण्याचे धोरण अवलंबले असल्याची माहिती कॉंग्रेस तालुका उपाध्यक्ष सच्चिदानंद बुगडे यांनी दिली आहे.

यावेळी ते म्हणाले की, तळवडे येथील शिवसेना पदाधिकारी तोंडावर एक बोलत असून, कृती दुसरीच करत आहेत. याचा प्रत्यय आल्यानेच कॉंग्रेस ने महाविकास आघाडी पासून फारकत घेत अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले आहे. यावेळी आपण शिवसेनेसोबत नाही असे ही बुगडे यांनी जाहीर केले आहे. सेनेने ऐनवेळी कॉंग्रेसचे ठरलेले उमदेवार दगाबाजी करत आपल्या पॅनल मध्ये घेऊन विश्वासघात केला आहे. असा आरोप देखील बुगडे यांनी यावेळी केला आहे. यावेळी त्यांनी भविष्यात येणाऱ्या सोसायटी, जिल्हा बँक, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सर्व निवडणुका सेनेच्या गद्दारी व विश्वासघात या कार्यशैलीमुळे कॉंग्रेसने स्वतंत्र लढवाव्यात असे मत देखील व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा