You are currently viewing सुदेश आचरेकर यांच्या तत्परतेने मेकॅनिकल रोड येथील समस्या मार्गी

सुदेश आचरेकर यांच्या तत्परतेने मेकॅनिकल रोड येथील समस्या मार्गी

मालवण

मालवण शहरातील मेकॅनिकल रोड मार्गावर गटार व पाणी प्रवाह वाहून नेणाऱ्या मोरीची पडझड झाल्याने समस्या निर्माण झाल्याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तात्काळ नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून कार्यवाही करत मोरी बसवून मार्ग पूर्ववत केला आहे.

मालवण नगरपालिका बांधकाम अधिकारी हळदणकर , राजा केरीपाळे यांना सुदेश आचरेकर यांनी सदर समस्येबाबत सांगून त्वरित कार्यवाहीची मागणी केली. त्यानुसार नगरपालिका कर्मचारी मिथुन शिगले, कोकरे यांनी अन्य कर्मचारी यांच्या माध्यमातून शुक्रवारी कार्यवाही पूर्ण करत जाण्या येण्याचा मार्ग सुरळीत केला. यावेळी भूषण मेस्त्री, पिंटू मेस्त्री, गणेश कुडाळकर, विलास मुणगेकर, सदा चुरी, बबन मेस्त्री यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

स्थानिक नागरिकानी सुदेश आचरेकर तसेच दीपक पाटकर यांचे लक्ष वेधताच प्रशासन माध्यमातून तात्काळ कार्यवाही झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, लवकरच याठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून कार्यवाही केली जाणार आहे. नगरोत्थान निधीतीची तरतूद करण्यात आली असून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच पावसा नंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. तोपर्यंत तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अशी माहिती माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा