अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यात आज अवकाळी पावसाने आपली मोठी हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे काजू व आंबा पिकांचे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दोडामार्ग मध्ये गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आहे.आजचा पाऊस व ढगाळ वातावरण लक्षात घेता काजू व आंबा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येणार आहे. सद्याची उत्पादक शेती वाचविण्यासाठी कृषि विभागाने तात्काळ शेतकऱ्यांना कीड व रोग या उपाययोजनेवर मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा