You are currently viewing पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात” कार्यक्रमाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात” कार्यक्रमाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसमवेत पाहिला कार्यक्रम

१०० वी “मन की बात” व्यापक स्वरूपात जनतेपर्यंत, सार्वजनिक ठिकाणी स्क्रीन द्वारे केले प्रसारण

कणकवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात” कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.व्यापक स्वरूपात घरोघरी हा कार्यक्रम पाहिला जावा,भारतीय जनता पार्टीच्या बुथवर त्याच प्रमाणेच सार्वजनिक ठिकाणी सुद्धा स्क्रीनवर मन की बात पाहता यावी यासाठी नियोजन करण्यात आले होते.तर आमदार नितेश राणे यांनी कणकवली देवगड वैभववाडी हे आपल्या मतदार संघात शंभरावा “मन की बात” कार्यक्रम जनतेला पाहता यावा म्हणून विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते. दरम्यान कणकवली शहर येथे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मन की बात कार्यक्रमात सहभाग झाले.यावेळी आमदार नितेश राणे त्यांचे समवेत उपस्थित होते.

कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विचार घरोघरी पोहोचविण्यासाठी मन की बात कार्यक्रमाचे व्यापक स्वरूपात नियोजन करण्यात आले होते.प्रत्येक मन की बात कार्यक्रमाचे अशाच पद्धतीने प्रत्येक वेळी नियोजन केले जाते. या आजच्या मन की बात कार्यक्रमाला सुद्धा मागील कार्यक्रमा प्रमाणेच व्यापक स्वरूप प्राप्त झालेले होते. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक बुथवर कार्यकर्ते, पदाधिकारी एक वटून मन की बात कार्यक्रम पाहतात- ऐकतात त्याचप्रमाणे घराघरात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार आत्मसात करण्यासाठी मन की बात कार्यक्रम लावला जातो व पाहिला जातो. आजच्या मन की बात कार्यक्रमात सुद्धा अबाल वृद्धांसह गृहिणी त्याचप्रमाणे पुरुषवर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता.

कणकवली शहरात मातोश्री हॉल येथे मोठ्या स्क्रीनवर मन के बाद कार्यक्रम दाखवण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मिस्त्री, नगराध्यक्ष समीर नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हरणे बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, शहराध्यक्ष अण्णा कोदे,भाजप प्रदेश महिला सदस्य प्रज्ञा ढवण, राजश्री धुमाळे, तालुका उपाध्यक्ष संजना सदडेकर, प्राची करपे, कलमठ सरपंच संदीप मिस्त्री, वकील राजेश परुळेकर, अजय गांगण, मिलिंद चिंदरकर राज्यसभा संख्या कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − 2 =