….तर आम्ही शिवसेनेचाच सरपंच बिनविरोध निवडून आणू

….तर आम्ही शिवसेनेचाच सरपंच बिनविरोध निवडून आणू

….तर आम्ही शिवसेनेचाच सरपंच बिनविरोध निवडून आणू, : झाराप पंचायत समिती सदस्य स्वप्ना वारंग- लंगवे

कुडाळ / प्रतिनिधी :-

हुमरस गावची पीडित महिला हि एका शिवसैनिकाचीच पत्नी,याची तरी भान शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुखाना असावी, पालकमंत्री, आमदार ,खासदार यांनी वेळेत जर त्या पीडितेला न्याय मिळवून दिला असता तर आम्हाला त्या पीडितेसाठी यायची गरज पडलीच नसती पण पीडितेपेक्षा सरपंचाला महत्व की कोणते अर्थकारण हे जनता नक्कीच समजण्याएवढी सुज्ञ आहे, जेवढी तत्परता सरपंचाच्या गुन्ह्यावर पांघरून घालण्यासाठी दाखवतात तेव्हढीच तत्परता दोडामार्गमधील एका शिवसेना शाखा प्रमुख व उपसरपंच जो महिलांची अंतर्वस्त्र चोरणाऱ्या तसेच हुमरस सरपंच अनुप नाईक यांनी पक्ष्याच्याच कार्यकर्त्यांच्या पत्नीवर वाईट नजर घातल्यावर का नाही दाखवत जान्हवी सावंत? आपण स्वतः रिकामटेकडे नाहीत असे सांगता मग आज पर्यंत साधी या दोन्ही ठिकाणी पीडितेना भेटावस अस का नाही वाटलं, की फक्त बरेच दिवस आंब्रड मधील निवडणुकीत 2000 मतांनी हरल्या नंतर पालकमंत्री आमदार खासदार यांना खुष करण्यासाठीचा खटाटोप म्हणावा का? आणि हो तुम्हीच सांगितले ते बरोबर आहे महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण वेळ देणारी व्यक्ती च भाजपा ला हवी असल्याने संध्या तेरसे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली.

आमदारांच्या मागे लागून स्वतःच्या फायद्यासाठी दुकान नाही थाटले संध्या तेरसेंनी. संध्या तेरसे वाईटच आहेत असं गृहीत धरूया पण आपण एवढ्या मोठ्या महिला नेत्या स्वतःच्या पक्षातील पिडीत महिलेला साधा सहानुभूती चा शब्द नाही. स्वतः महिला आहात हे विसरलात काय? भारतीय जनता प क्षात संघटनेचं काम करण्यासाठी महिलांची संख्याच एवढी मोठी आहे…. पण ते तुम्हाला काय कळणार म्हणा! कार्यकारिणी बरखास्त नाही केली वाढवली बरखास्त केली असेल तर द्यावा पुरावा नाहीतर तोंड आहे म्हणून उगाचच बोलून तोंडघशी पडू नये. सावंतवाडीतील पीडित मुलीवर कोणात्या आमदारांच्या हॉटेलवर तो दुर्दैवी बलात्कार झाला त्याची घ्यावी माहिती आम्ही आवाज उठवावा तुम्ही साथ द्याल असे तुम्ही म्हणता , मग हुमरस ग्रामस्थानबरोबर आम्ही आवाज उठवला तुम्ही शब्दाला जागणार की शब्द मागे घेणार? याद्वारे तुम्हाला मी आव्हान व शब्द देते तुम्ही अश्या वृत्तीच्या सरपंचाचा राजीनामा घ्यावा आम्ही गावातील कोणीही सरपंच पदाचा फॉर्म भरणार नाही तुम्ही जे नाव सुचवाल त्याला बिनविरोध शिवसेना सरपंच म्हणून निवडून देऊ, म्हणजे तुम्हाला जे राजकारण वाटते तेही होणार नाही, आहे का तयारी शिवसेनेची? म्हणजे तुम्हाला वाटणारी राजकीय पोळी हि तुम्हालाच लखलाभ होईल.

आपणही एक महिला आहात असे गुन्हेगार जर मोकाट सुटले तर कोणाच्या घरात कधी प्रसंग येईल हे सांगता येत नाही, त्यामुळे आपणही यात राजकारण न करता वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे ज्ञायव्यवस्थेवर विश्वास आहेच पण ती चालवणाऱ्यावर विश्वास ठेवावा की नाही हे तुमच्या निर्णयावर नक्कीच समजेल.राजकारण नक्कीच करू पण अश्या वेळी या वृत्तीच्या विरोधात सर्वांनी येण गरजेचे आहे, यावर नको त्या व्यक्तीचे म्हणणे न देता आपण किंवा आपल्या पक्ष्याच्या पालकमंत्री, खासदार व आमदार यांनी उत्तर देणे अपेक्षित.

प्रतिक्रिया व्यक्त करा