You are currently viewing कळसुली मतदारसंघांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

कळसुली मतदारसंघांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

कणकवली (प्रतिनिधी) :

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कळसुली मतदार संघांत रक्तदान शिबिर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांच्या उपस्थतीत कळसुली उपकेंद्र दिडवणे येथे रक्तदान शिबिर आयोजन केले होते. यात १५जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांच्या हस्ते झाले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस, ग्रा. प. स. चंद्रशेखर चव्हान, ग्रा.प.स.किशोर घाडीगावकर, ॲड. भरत गावकर, सोसायटी चेअरमन रामचंद्र नाईक, कृषा गावकर, तातू गावकर, सागर शिर्के, बाबाजी मुरकर, लक्ष्मण घाडीगांवकर, सत्यविजय परब, अभी नाडकर्णी, विकास दळवी, डेव्हिड फर्नांडीस, समुदाय आरोग्य अधिकारी दिडवणे श्रीम जाम्सीन शेख, समुदाय आरोग्य अधिकारी शिवडाव श्रीमती सुजाता आरकडे, आरोग्य सेवक दिडवणे रामेश्वर चिभडे, मदतनीस दिडवणे विद्या दळवी, स्नेहा चव्हाण उपस्थीत होते.

*जनतेसाठी काम करत राहणार प्रफुल्ल सुद्रिक*

जनतेसाठी सातत्याने रात्री अपरात्री आमचे नेते काम करतात त्याच धर्तीवर लोकांसाठी अन्यायाच्या ठिकाणी धावून जाण्याची भूमिका मी आणि माझे सहकारी बजावत आहोत. सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी रक्तदान शिबिर करतो. यावर्षी पहिल्याच रक्तदान शिबिरात माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या मेहनतीमुळे १५ रक्तदाते सहभागी झाले होते. पुढील जीवनात जनतेची सेवा करत राहणार असल्याचे राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल सुद्रिक यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा