You are currently viewing कणकवली पंचायत समिती सभापतीनिवडणुक 12 जानेवारी रोजी

कणकवली पंचायत समिती सभापतीनिवडणुक 12 जानेवारी रोजी

सिंधुदुर्गनगरी 

कणकवली पंचायत समिती सभापती यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठीच्या निवडीसाठी 12 जानेवारी 2021 रोजी कणकवली पंचायत समितीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 75 नुसार पंचायत समिती सभापती पद भरणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष सभा आयोजित करणे आवश्यक असल्याने सभापती निवडणूक घेण्यासाठी 12 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3.00 वा. विशेष सभा बोलावण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तसेच या निवडणुकीसाठी दिनांक 12 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11.00 ते 1.00 या कालावधीमध्ये नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येणार आहेत.

            या निवडणूकीसाठी पिठासन अधिकारी म्हणून तहसिलदार, कणकवली यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच कणकवली पंचायत समिती सभापती हे पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. सभापती पंचायत समिती यांचा कालावधी दिनांक 26 डिसेंबर 2019 पासून होणाऱ्या अडीच वर्षांच्या कालावधीमधील उर्वरीत कालावधीकरिता आहे.

            विशेष सभेचे कामकाज पुढील प्रमाणे चालवण्यात येणार आहे. दुपारी 3.00 ते 3.10 नामनिर्देशन पत्राची छाननी, दुपारी  3.11 ते 3.15 वैधरित्या नामनिर्देशित उमेदवरांची नावे घोषित करणे, दुपारी 3.16 ते 3.30 नामनिर्देशन अर्ज मागे घेणे, दुपारी 3.31 ते 3.34 नामनिर्देशन अर्ज मागे घेतलेले तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार यांच्या नावांची घोषणा करणे, दुपारी 3.35 वाजलेपासून आवश्यक असल्यास हात वर करून मतदान घेणे, मतदान संपल्यानंतर मतमोजणी व निकाल जाहीर करणे या प्रमाणे सभेचे कामकाज चालविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − six =