You are currently viewing पाच वर्षात पैसे दुप्पट करून देतो असे सांगून फोंडाघाट बावीचे भाटले येथील रहिवाशांची फसवणूक

पाच वर्षात पैसे दुप्पट करून देतो असे सांगून फोंडाघाट बावीचे भाटले येथील रहिवाशांची फसवणूक

आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्गच्या निरीक्षकांकडे तक्रार दाखल

कणकवली

पाच वर्षात पैसे दुप्पट करून देतो असे सांगून गुतवणूक करून घेवून फोंडाघाट बावीचे भाटले येथील रहिवाशी शांताराम हौसू चौगुले वय ४५ व त्यांची पत्नी शर्मिला शांताराम चौगुले वय ३८ यांनी केलेल्या फसवणूक प्रकरणी कारवाई व्हावी अशी मागणी करत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी ठेवीदारांसह आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्गच्या निरीक्षकांची भेट घेतली. यावेळी ठेवीदारांनी आपली तक्रार दाखल केली असून, संबंधितांवर कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अनंत पिळणकर यांनी दिला आहे.

यावेळी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्गच्या निरीक्षकांना अनंत पिळणकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शांताराम हौसू चौगुले वय ४५ व त्यांची पत्नी शर्मिला शांताराम चौगुले वय ३८ राहणार- मु. पो. फोंडाघाट बावीचे भाटले तालुका कणकवली जिल्हा- सिंधुदुर्ग या पती पत्नींनी फोंडाघाट बावीचे भाटले येथील रहिवाशी
१)बाबू धुळू बोडके २) बाबुराव बबन गावडे ३) राजेश राजाराम धुरी ४) सौ. मयूरी विठोबा येंडे ५)अनिल राघो विश्वेकर ६) सौ. सारिका संतोष सावंत ७) सौ. मनीषा मंगेश सावंत ८) सौ. सुलोचना राघो विश्वेकर ९) सौ. ताई धोंडू कोकरे. यांच्या आर्थिक निरक्षरतेचा फायदा घेवून त्यांचे पैसे दुप्पट करून देतो असे सांगून फसवणूक केली आहे. या ठेवीदारांसह अन्य ठेवीदारांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे आणि अनेक गोरगरीब निरक्षर लोकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
शांताराम हौसू चौगुले हे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीला अस्सल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून या अशिक्षित लोकांनी गुंतवणूक केली आहे तरी आर्थिक फसवणूक झालेल्या वरील लोकांची तक्रार दाखल करून घेवून संबंधित चौगुले दांपत्त्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा.

याप्रकरणी आपल्याकडून ठोस कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या ठेवीदारांसह मोठे जनआंदोलन छेडू याची आपण दखल घ्यावी. असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान यावेळो आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्गच्या निरीक्षकांकडे फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी आपली लेखी तक्रार दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 1 =