दळवी महाविद्यालयाच्या तळेरेतील क्रीडासंकुलासाठी जागा पाहणी…

दळवी महाविद्यालयाच्या तळेरेतील क्रीडासंकुलासाठी जागा पाहणी…

‘विश्वविजयोत्सव क्रीडा’ स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी कूलगुरूनी केलेली घोषणा लवकरच सत्यात उतरणार..

तळेरे

तळेरे, येथील मुंबई विद्यापीठाचे घटक महाविद्यालय, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाचे क्रीडासंकुल उभारण्यासाठीची जागा पाहणी प्रक्रिया समिती कडून पूर्णत्वास आली आहे.
नुकत्याच पार पाडलेल्या दळवी महाविद्यालयाच्या ‘विश्वविजयोत्सव 2020’ या ऑनलाईन क्रीडामहोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी “ग्रामीण भागातील खेळाडूंना विविध खेळ खेळण्यासाठी क्रीडासंकुल निर्माण व्हावे व त्यासाठीचे प्रयत्न केले जावेत” असे विचार व्यक्त होते.
दळवी महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक प्रा. विनायक दळवी यांनी यावर कार्यवाही करत काही स्थानिक ग्रामस्थांशी सुसंवाद साधून जागा उपलब्धतेची चाचपणी केली. मुंबई विद्यापिठाने तात्काळ जागा निवडीसाठी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. सदर समिती सदस्य एस.एम राणे (अभियंता, मुंबई विद्यापीठ),डॉ. विश्वंभर जाधव (शारीरिक शिक्षक,मुंबई विद्यापीठ)
डॉ.एस.डी.दिसले (प्राचार्य,
एस. आर. एम कॉलेज कुडाळ)
व डॉ.एस.के.पवार (समन्वयक,
विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय, तळेरे)
यांनी कणकवली तालुक्यातील मौजे दारुम, तळेरे व शिडवणे येथील जागांची पाहणी केली.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी होण्यासाठीची पूर्वतयारी करण्यासाठी क्रीडासंकुलाची आवश्यकता ह्या भागात होती. दळवी महाविद्यालयाच्या माध्यमातून हे कार्य होत असल्याने या भागातील खेळाडू, विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या आशा पल्लवित झाल्या असून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘खेळाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास’ या विश्वविज्योस्थवाचे प्रमुख पाहुणे असलेल्या दत्तात्रय मारकड सरांनी मांडलेल्या संकल्पनेला प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी दळवी महाविद्यालयाचे हे पाऊल महत्वपूर्ण ठरणारे आहे. ह्या संदर्भात आणखी काही जागा उपलब्ध असल्यास त्याची माहिती सदर समितीचे सभासद डॉ. एस.के पवार अथवा, दळवी महाविद्यालयाचा कार्यालयास पुढील 10-15 दिवसात द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.


मुंबई विद्यापीठ नियोजित क्रीडासंकुलासाठी तळेले येथे जागेची पाहणी करताना विद्यापीठाचे अधिकारी सोबत तळेरे येथील दळवी महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा